अंजनसिंगी लोकमत न्यूज नेटवर्क जागतिक ध्यान दिवसाच्या निमित्ताने येथील श्री कान्होजीबाबा कनिष्ठ महाविद्यालयात सहजयोगाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेमध्ये गौरव ठाकरे यांनी आपल्या ओघवत्या वाणीने सहजयोगाबद्दल विस्तृत माहिती दिली.तसेच त्यांनी सहयोगाची अनुभूती,मुलांना सहजयोगातून मिळवून दिली. आपल्या शरीरात असणाऱ्या विविध चक्र बाबत सुंदर माहिती दिली.तसेच कुंडलिनी जागृती बाबत माहीती देऊन त्याचे विध्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात कसे फायदे होतात ते सांगितले. सतीश उईके सर यांनी विध्यार्थी दशेत योगाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले.प्रा.अतुल ठाकरे सर यांनी आपल्या व्याख्यानात ध्यान मानवाच्या मनाला कसे शांत ठेऊ शकते,हे सोदाहरण स्पष्ट केले.प्रा.श्रीखंडे यांनी प्रत्यक्ष ध्यान अनुभूती विषयी आपले अनुभव कथन केले.या कार्यक्रमात प्रा.उज्वला चांबटकर यांनी आभार मानले.या कार्यक्रमाला प्रा.रवींद्र पवार ,प्रा.मंजुषा हटवार , श्री राहुल हांडे,संग्राम गोरले,रितेश कडू यांचे सहकार्य लाभले.या कार्यशाळेला विद्यार्थ्यांची भरगोस उपस्तिथी होती.अश्या कार्यशाळेच्या आयोजनाने विध्यार्ध्यांमध्ये आनंद संचारतो.













