उत्कृष्ट शेतकरी व सामाजिक कार्याची दखल रमेशराव ठवकर यांना ‘सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार’

0
11

तळेगाव दशासर :
ग्रामविकास आणि कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान तसेच सामाजिक बांधिलकी जपत सतत कार्यरत असलेल्या तळेगाव दशासर येथील रमेशराव ठवकर यांना ‘सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार 2025’ ने सन्मानित करण्यात आले आहे.

हा पुरस्कार मनीभाई मानव सेवा ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने प्रदान करण्यात येत असून उत्कृष्ट शेतकरी म्हणून नावारूपासह समाजहिताचे उपक्रम राबविल्याबद्दल रमेशराव ठवकर यांची निवड करण्यात आली.

या सन्मानामुळे तळेगाव दशासर गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील नागरिकांनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ठवकर यांचे अभिनंदन केले आहे.

veer nayak

Google Ad