आमदारांनी दिलेल्या शब्दाचे आश्वासन पूर्ण केले
06 नोव्हें रोजी वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रकाशित झाली होती
चांदुर रेल्वे /शहरातील मुख्य रस्त्यावर पडलेल्या मोठमोठे खड्डे भरण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत सुरू झाले आहे,त्यामुळे दुधाची ताण ताका वर भागवणे या मराठी म्हणी प्रमाणे का होईना यामुळे शहरातील व ग्रामीण भागातून शहरात वाहतूक करणाऱ्या नागरिकांना होणाऱ्या त्रासा मध्ये थोड्या फार प्रमाणात उसंती मिळणार आहे,तर धामणगाव विधानसभेचे आमदार यांनी वृत्तपत्राला दिलेल्या आश्वासन पूर्ण केल्याचे दिसून येते,
शहरातील हा मुख्य मार्ग रेल्वे स्टेशन ते खडकपूरा पर्यंत असून या रस्त्यावर शहरातील ग्रामीण रुग्णालय रेल्वे स्टेशन सार्वजनिक बांधकाम विभाग एसटी महामंडळ पोलीस स्टेशन विभाग पोस्ट ऑफिस पंचायत समिती या व्यतिरिक्त शहरातील सर्व शाळा व खाजगी दवाखाने याच मार्गावर तरी मागील अनेक वर्षापासून या रस्त्याची अतिशय दैनिक अवस्था झाल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता,रस्ते खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता अशी दैनिक अवस्था या रस्त्याची झाली आहे अनेक वेळा खड्डे वाचवण्याचे प्रयत्नात वाहनधारकांचे अपघात झाले आहे,मात्र शहराच्या या गंभीर समस्येकडे अधिकारी पासून तर लोकप्रतिनिधी लक्ष देण्यात तयार नसून नागरिक लोकप्रतिनिधी व स्थानिक अधिकाऱ्यांना केविल वाणी प्रश्न करत साहेब आम्हाला या खड्डेमय रस्त्यातून केव्हा सुटका मिळेल असा केविलवाणी प्रश्न करत होते,06नोव्हें रोजी सकाळ वृत्तपत्रांमध्ये या रस्त्याच्या बाबतीत बातमी सुद्धा प्रकाशित करण्यात आली होती यावेळी धामणगाव विधानसभा चे आमदार प्रताप अडसड यांनी रस्त्याचे काम प्रस्तावित असून येणाऱ्या सहा ते सात महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते,तर अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्पुरती काही दिवसात रस्त्याची खड्डे भरून डागडूगी (पॅचेस) करू, असे आश्वासन दिले होते आमदार साहेबांनी दिलेले या शब्दा ची जमिनीवर पूर्तता होताना दिसत आहे, मात्र आमदार साहेबांनी पूर्ण रस्ता खरंच सात आठ महिन्यात बांधणार का?










