माणिकगड (अंतोरा) येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप हजारो भक्तांच्या संख्येत संपन्न

0
38

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : राष्ट्रसंताच्या विचाराचा वसा घेऊन युवकांनो शिक्षणाची कास धरा” असे प्रतिपादन माजी शालेय व उच्च तंत्र शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव अंतोरा येथे बोलताना व्यक्त केले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी राज्यसभा खासदार तथा कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चंद्रकांत हंडोरे, माजी शालेय व उच्च तंत्र शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके, देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी सेल vice- president श्री. तुषार पेंढारकर, श्री. बाळकृष्ण माऊसकर, प्रदेश महासचिव अनंत मोहोड, आर्वी विधानसभेतील जेष्ठ मार्गदर्शक प्रा. संजय वानखेडे, माजी कृषी अधिकारी श्री बाळासाहेब वेरूळकर, आर्वी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रा.डॉ. सुधाकर भुयार, कारंजा शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष गुणवंत मुडे, कारंजा ब्लॉकचे अध्यक्ष भास्कर पांडे ,आष्टी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष, दिनेश लांडे, श्री.संत सयाजी महाराज, विश्वशांती धाम येळा केळी, वृत्तपत्राचे जानकार श्री प्रकाश कथले, राष्ट्रवादीचे पदाधिकारी गोपालभाऊ मरसकोल्हे आर्वी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री पंकज गोडबोले आदींची उपस्थिती होती. 

याप्रसंगी प्रकाश पोहरे यांनी शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून राज्य सरकारच्या विरोधी धोरणामुळे शेतकरी आत्महत्या प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे अशी खंत व्यक्त केली. सध्या राज्यात वाढती महागाई, बेसुमार बेरोजगारी, शेतकऱ्याच्या शेती मालास हमीभाव, शेतकऱ्याचे बी- बियाणे, खते यांच्या किमतीस भरमसाठ वाढ आदी समस्येला बगल देऊन विचलित करण्याचा राज्य शासनाचा केविलवाना प्रयत्न सुरू आहे असे ते म्हणाले. 

याप्रसंगी शालांत परीक्षेत उत्कृष्ट गुण प्राप्त केल्याबद्दल वेदांत घनश्याम धानोरकर, कु. रसिका हेमराज बाहे यांचा तसेच माजी सरपंच सौ. शालिनी कोडापे, सरपंच सौ. उज्वला मुंदाने, महिला काँग्रेस पदाधिकारी प्रज्ञा मांडवकर यांचा शाल, श्रीफळ देऊन अनंत मोहोड त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजिरी भजन यांच्या माध्यमातून लोकांमध्ये रणसंग्राम फुंकून देशाच्या स्वातंत्र्य निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, भारत हे बलशाली राष्ट्र व्हावे अशी महाराजांची इच्छा व्यक्त करून माणिकगड टेकडीवर विद्यार्थ्यासाठी अभ्यासिका करीता निधी मंजूर करून देण्याची ग्वाही याप्रसंगी दिली.

याप्रसंगी माजी शालेय व उच्च तंत्र शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी राज्यात वर्णव्यवस्था, अंधश्रद्धा निर्मूलन उच्चाटन करून सर्वधर्मसमभाव भावना जोपासावी तसेच “ग्रामगीता हा ग्रंथ मानवी जीवनाची गुरुकिल्ली” असून त्यांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे असे ते पुढे म्हणाले. 

महोत्सवातील प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री अभिजीत वंजारी विधानपरिषद आमदार, नागपुर विभाग यांनी राष्ट्रसंतांच्या पावन भूमीला भेटी प्रसंगी असंख्य भक्तांच्या साक्षीने विधान परिषद आमदार निधीतून परिसराच्या विकासाकरिता आर्थिक मदतीची घोषणा केली.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव अनंत मोहोड यांनी दिली राष्ट्रसंतांच्या चरण स्पर्शाने पावन असलेला राष्ट्रसंतांचा पुण्यतिथी महोत्सव माझे वडील दिवंगत बाबूजी मोहोड यांच्या प्रेरणेतून सुरू झालेला उपक्रम अखंडपणे सातत्याने सुरू राहील तसेच माणिकगड टेकडीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी आपले योगदान व आपला सहभाग ठेवण्याचे आवाहन याप्रसंगी केले. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर जोरे, संचालन आशिष मोहोड तर आभार प्राचार्य सतीश कातोडे यांनी मानले. या कार्यक्रमास गावातील व परिसरातील नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

veer nayak

Google Ad