चांदुर रेल्वे/ रस्त्यावरील वाढते अपघात आणि त्यामध्ये होणारी जीवित हानी टाळण्यासाठी सुरक्षिते ची जागरूकता जीवन वाचविते हा संदेश देत ता 10 मंगळवार रोजी शहरातील बाळासाहेब ठाकरे चौकात राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून कोनटा एन, एक्स,टी,अमरावती,व चांदुर रेल्वे पोलीस प्रशासना च्या वतीने राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान राबवत अनेक वाहनधारकां ना हेल्मेट चे वाटप करण्यात आले, यावेळी अनेक दुचाकी सवारा ना रास्ते सुरक्षे चे नियम पाळण्याचे आवाहन करत जे चालक हेल्मेट विना प्रवास करत होते त्यांना हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्यात आले,राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ एक मोहीम नसून ते आपले कर्तव्य आहे रस्त्याची सुरक्षा जीवनाची रक्षा हे बिद्र वाक्य प्रत्येकाने अंगीकारल्यास अपघाताचे प्रमाण निश्चितच कमी होईल हेल्मेट हे ओझे नसून ते जीवन रक्षक कवच आहे याची जाणीव यानिमित्ताने वाहनधारकांना करून देण्यात आली
या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत असून मोठ्या संख्येने नागरिक व पोलीस कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी होते, या उपक्रमाला कोनटा एन एक्स टी अमरावतीचे प्रोजेक्ट हेड दामोदर रेड्डी चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नंदलाल लिंगोट,सुरेंद्र गेडाम, ट्रॅफिक अमलदार योगेश नेवारे प्रामुख्याने उपस्थित होते,















