राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्वयंसेवक आणि हिंदूंच्या भरोशावर राष्ट्र परम वैभवापर्यंत न्यायचे आहे.. विपिन जी काकडे छत्रपती शिवाजी वस्तीचे हिंदू संमेलन व छत्रपतींची जयंती थाटात संपन्न

0
28

धामणगाव रेल्वे,

राष्ट्र मोठे व्हावे परम वैभवपर्यंत राष्ट्राची प्रगती व्हावी हेच कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या असंख्य स्वयंसेवकांच्या आणि हिंदूंच्या भरोशावर शताब्दी वर्षात करू इच्छितो परंतु याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ श्रेय घेवू इच्छित नाही असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक विपिनजी काकडे यांनी येथे व्यक्त केले

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती ही १८ पगड जातीतील लोकांना एकत्र घेऊन केली आजही आपल्याला जात-पात मत विसरून आपण हिंदू म्हणून एक आहोत हा भाव प्रत्येकाच्या मनात जागृत करण्याकरिता हिंदू संमेलन व राजे छत्रपतींची जयंतीचे आयोजन करण्यात आलेले आहे

ते श्री शिवाजी वस्ती येथील हिंदू संमेलन व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बोलत होते

हिंदू संमेलनाची प्रासंगिकता व्यक्त करत असताना काकडे म्हणाले की व्यक्ती समाज आणि धर्म या बाबीचे एक अधिष्ठान आहे.

याप्रसंगी त्यांनी सामाजिक समरसता कुटुंब प्रबोधन पर्यावरण स्वबोध नागरिक शिष्टाचार इत्यादी पंच परिवर्तन विषयावर आपले मत व्यक्त केले.

स्थानिक धामणगाव रेल्वे येथील छत्रपती शिवाजी वस्ती चे विशाल हिंदू संमेलन छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पावन पर्वावरती संपन्न झाले

या कार्यक्रमाला आशीर्वचन देण्याकरिता ह.भ.प. चंदाताई काटे,इस्कॉन चे दामोदर दुलाल दास(दिनेश बुधलानी) तर संयोजक दिलीप सूर्यवंशी,प्रकाश लोहे मंचावर उपस्थित होते

या मंगलमय प्रसंगी नवरंग चौक या वस्तीमधून भव्य शोभा यात्रा, कलश यात्रा काढण्यात आली ज्यामध्ये वस्ती मधील शेकडो हिंदू बांधवांनी सहभाग घेतला. महिलांची कलश यात्रा प्रमुख आकर्षण ठरली

अनेक ठिकाणी शोभायात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन सौ.चारुलता दारोकार प्रास्ताविक व आभार दिलीप सूर्यवंशी यांनी मानले

veer nayak

Google Ad