धामणगाव रेल्वे | दिनांक : २२/०२/२०२६
School of Scholars, Dhamangaon Railway या विद्यालयाने शिक्षण व संस्कृती क्षेत्रात एकाच वेळी दोन मानाचे पुरस्कार मिळवून जिल्ह्याचे नाव गौरविले आहे. आदरणीय प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी यांच्या कुशल, दूरदर्शी व प्रेरणादायी नेतृत्वाखाली विद्यालयाला मिमांसा संस्थेतर्फे “मोस्ट कल्चरल्ली प्रोग्रेसिव स्कूल अवॉर्ड” प्रदान करण्यात आला.
सांस्कृतिक उपक्रम, सर्जनशील कार्यक्रम, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. विद्यालयात नियमितपणे आयोजित होणारे सांस्कृतिक उत्सव, विविध स्पर्धा आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या यशामुळे संपूर्ण विद्यालय परिवारात आनंदाचे वातावरण आहे.

याच अनुषंगाने Nagpur येथे आयोजित “मिमांसा सुपर ३० इन्स्पिरेशनल एज्युकेटर अवॉर्ड” सोहळ्यात प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी यांना *“मिमांसा सुपर ३० इन्स्पिरेशनल एज्युकेटर अवॉर्ड” देऊन सन्मानित करण्यात आले. देशभरातून निवडलेल्या २५० प्राचार्यांमधून केवळ ३० प्राचार्यांची या विशेष सन्मानासाठी निवड करण्यात आली, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
शैक्षणिक गुणवत्ता, प्रभावी नेतृत्व, नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि विद्यालयाला नवी उंची गाठून देण्यासाठी केलेले योगदान या निकषांवर हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या दुहेरी यशामुळे सशक्त नेतृत्व, संघभावना आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय परिवर्तन घडवून आणता येते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विद्यालय परिवाराच्या वतीने प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
या यशाबद्दल उपप्राचार्य तुषार रेवतकर, प्री-प्रायमरी विभाग प्रमुख शबाना खान, प्रशासकीय अधिकारी प्रीतेश जुनवाडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्राचार्या महोदया यांचे अभिनंदन केले.











