संत लहरी बाबा संस्थान येथे भक्तिमय सोहळा गायक सागर ठाकरे यांच्या भावस्पर्शी भजनांनी भाविक तल्लीन

0
2

धामणगाव रेल्वे :- तालुक्यातील जळगाव आर्वी येथील प्रसिद्ध संत लहरी बाबा संस्थान येथे अखंड भागवत सप्ताहाच्या पावन पर्वानिमित्त प्रथमपुष्प भक्तिसंगीताचा अत्यंत भक्तिमय कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमात स्वारसिंधू कला मंचचे गायक सागर ठाकरे व त्यांच्या संचाने सादर केलेल्या भावपूर्ण भजन-भक्तिगीतांनी उपस्थित भाविक भक्तिरसात पूर्णतः तल्लीन झाले होते.

कार्यक्रमात नामस्मरण, अभंग, भक्तिगीते व गवळणी यांचे सुरेल सादरीकरण करण्यात आले. प्रत्येक भजनाला भाविकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. “लहरी बाबांच्या नामात रंगुनी” तसेच “विठ्ठल विठ्ठल” या गजरांनी संपूर्ण परिसर अध्यात्मिक ऊर्जेने भारून गेला.या भक्तिसंगीत कार्यक्रमात स्वारसिंधू कला मंचचे प्रा. सतीश राऊत, प्रा. सचिन घारफळकर, मंगेश भुजबळ, प्रा. प्रफुल्ल महल्ले, प्रज्वल गुल्हाने व संजय देशमुख यांनीही आपल्या गायनातून विशेष रंगत आणली.बासरीवादक प्रमोद भेंडे यांच्या मधुर बासरीसुरांनी व तबलावादक योगेश ससनकर यांच्या तालबद्ध साथीत भजनांना अधिकच साज चढला.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष डॉ. अनंत मुळे व विश्वस्त मंडळाच्या वतीने सर्व कलाकारांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी, अशा भक्तिसंगीत कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मकता, एकोप्याची भावना व अध्यात्मिक जाणीव वृद्धिंगत होते, असे मत व्यक्त केले.एकूणच अखंड भागवत सप्ताहाच्या या दिवशी झालेल्या भक्तिसंगीत कार्यक्रमाने भाविकांच्या मनावर अमीट ठसा उमटविला. परिसरात या कार्यक्रमाची भक्तिभावाने सुरवात झाली असून भाविकांनी आध्यात्मिक समाधान व आनंद व्यक्त केला जात आहे.

veer nayak

Google Ad