तेली समाजाला डावलुन स्वतःच्या पत्नीला काँग्रेसची आर्वीत अध्यक्ष पदाची उमेदवारी मिळावा म्हणून रचला डाव

0
616

काँग्रेस जिल्हाध्यक्षाची ऐन वेळेवर एबी फॉर्मची पळवा पळवी

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : येथे नगरपरिष निवडणुकीमध्ये वेळेपर्यंत पक्षाचे एबी फॉर्म न आल्यामुळे काँग्रेस पक्षाकडून उभे राहणाऱ्यांची चांगलीच गोची झाली असून काँग्रेस पक्षाचे एबी फॉर्म देण्याची जिल्हा अध्यक्षाची जबाबदारी हाेती. परंतु पक्षाच्या प्रोटोकॉल नुसार शहराध्यक्षाकडे द्यायला पाहिजे मात्र काँग्रेस शहराध्यक्ष सुधाकर भुयार यांच्याकडे एकही एबी फॉर्म आलेला नाही हा संशोधनाचा भाग आहे मात्र एबी फॉर्म कोणाच्या सांगण्यावरून कुठे गेले आणि कोणी दिला बाळा जगतापच्या पत्नीला नगराध्यक्षपदाचा व चार सदस्या करिता एबी फॉर्म काँग्रेसच्या लिस्टमध्ये हे पाचही नाव नव्हते असे अनंत मोहाेड यांनी स्पष्ट केले परंतु एबी फॉर्म यांच्या पर्यंत गेले कसे हा मोठा संशोधनाचा भाग आहे याची पक्षाने सखोल चौकशी करायला पाहिजे व जे काही पक्षाचे पदाधिकारी दोषी असेल त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करायला पाहिजे असे अनंत मोहोड व शैलेश अग्रवाल व 25 सदस्य व 1 नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवारांनी दि 19/11/2025 रोजी वर्धा जिल्हा काँग्रेस प्रभारी राजेंद्र मुळक यांच्याकडे सविस्तर चर्चा करून मागणी केली. यावेळी प्रदेश सरचिटणीस अनंत मोहोड, किसान समन्वयक सदस्य शैलेश अग्रवाल, काँग्रेस शहराध्यक्ष सुधाकर भुयार, काँग्रेस वर्धा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर जोरे, काँग्रेस आर्वी तालुकाध्यक्ष चंद्रशेखर वनस्कर, रवींद्र कोहळे, कृष्णराव परतेकी, सुधाकर वाघमारे, पंकज गोडबोले, भास्कर पांडे, उमेश पाचपोर, दिनेश लांडे, हरीश भुंबर, आशिष खंडागळे, प्रकाश जयसिंगपुरे, विनोद हुड, निलेश घोरमाडे, अशोक मुळे, अशोक वानखडे, समीना हुसेन, सुनिता मुळे, शितल गायकवाड, राखी बिरोले, सूर्यकांत डोरले, अक्षय निस्ताने, उदित सिंगई, शुभम नागपुरे, भैय्या हराळे, व सर्व काँग्रेस पक्षाला जुळलेले सदस्य यावेळी प्रामुख्याने उपस्थित होत

दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी नागपूर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ आले असता तेथे आर्वी येथील काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना घडलेल्या सर्व प्रकारची माहिती दिली, यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून झालेल्या प्रकाराची मी गंभीर दखल घेतलेली आहे व योग्य ती कारवाई करू तसेच भविष्यात अशा घटना घडू नये याकरता योग्य ती खबरदारी घेतली जाईल असे आस्वस्थ केले 

काँग्रेसच्या स्थानिक पक्ष श्रेष्ठींना विश्वासात न घेता शरदचंद्र पवार राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसचे गटबंधन

काँग्रेस पक्षाचे एबी फॉर्म अंतिम वेळेच्या आत न आल्यामुळे काँग्रेसने अनंत मोहाेड व शैलेश अग्रवाल यांच्या नेतृत्वात तयार केलेले 25 सदस्य व 1 नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची चांगलीच उडाली तारांबळ 3 वाजेपर्यंत पक्षाचा एबी फॉर्म मिळालाच नाही इच्छुक सदस्य नामांकित अर्ज दाखल करण्यास संविधानाने दिलेल्या अधिकारापासून राहले वंचित

काँग्रेसच्या अगोदर ठरलेल्या लिस्ट प्रमाणे नगराध्यक्ष पदासाठी हे तीन नाव डॉक्टर मंजुषा अग्रवाल प्रणोती जयसिंगपूरे अनुराधा भुयार यांचे पक्षश्रेष्ठीकडे गेले होते. काँग्रेसचे 3 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच 25 नगरसेवक पदाचे उमेदवार

सर्व इच्छुक उमेदवार यांनी नागपूर येथे जाऊन वर्धा जिल्हा प्रभारी राजेंद्र मुळक यांची भेटही घेतली होती.  

त्यापैकी स्थानिक लेवलवर ठरवून काँग्रेसचेच 25 नगरसेवक व 1 नगराध्यक्ष पदाकरिता 17/11/2025 रोजी आपले नामांकन अर्ज घेऊन नगरपरिषद कार्यालय येथे वाट पाहत बसले

मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत एबी फॉर्म वेळेपर्यंत न मिळाल्याने उमेदवाराचा नामांकन अर्ज दाखल झाला नाही हे विशेष… काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आर्वी येथील स्थानिक नेत्यांचा चांगलाच गेम केला यामध्ये पंचवीसही नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींना जबाबदार ठरवत तीव्र नाराजी व्यक्त केली व मोठी मेहनत घेऊन काँग्रेसचे 25 उमेदवार शैलेश अग्रवाल अनंत मोहोड यांनी आर्वी शहरात नवीन काँग्रेसची फळी निर्माण करून उभे केले होते मात्र काही जिल्हा काँग्रेस कमिटी नेत्यांनी वेळेवर गेम करून काँग्रेसचाच घात केला त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या गटबंधनावर प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्वी शहरात रोशाचे वातावरण निर्माण झाले आहे याचा मोठ्या प्रमाणात या निवडणुकीमध्ये अशा गटबंधनावर तीव्र नाराजी व्यक्त करत अशा या महायुतीच्या या गटबंधनाला पराभव स्वीकारावा लागेल का? अशी देखील आर्वी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

veer nayak

Google Ad