कावली येथे स्मृतीशेष अंबादासजी हरीभाऊ टाले यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ टाले परिवाराच्या वतीने भगवान बुद्धांच्या 3.5फूट पितळेच्या मूर्तीचे दान करण्यात आले. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला बुद्धमूर्ती स्थापना व परित्राण पाठाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



या पवित्र कार्यक्रमात मूर्तीदानकर्ते प्रशांत अंबादासजी टाले परिवाराची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात धम्मपहाटी शांतता रॅली ने भंतेजी आणि बौद्ध उपासक आणि उपासिका यांचा उपस्थिती मध्ये आनंदाने संपन्न झाली, त्यांनंतर भंतेजी यांचा सूचनेनुसार सामुहिक बुद्ध वंदना आणि त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आली. त्यानंतर Bhante Subodh Bodhi Yenada यांच्या हस्ते भगवान बुद्धांच्या मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली. भंतेजींनी उपस्थितांना धम्म, करुणा, मैत्री आणि मानवतेचा संदेश देत समाजात बंधुभाव आणि शांतता टिकवून ठेवण्याचे आवाहन केले.
यानंतर भंतेजींच्या मार्गदर्शनाखाली परित्राण पाठ संपन्न झाला. या वेळी उपस्थित उपासक उपासकानी सहभाग घेत बुद्ध वंदना केली. संपूर्ण परिसर “बुद्धं शरणं गच्छामि” या मंगलमय घोषणांनी दुमदुमून गेला होता.
कार्यक्रमासाठी कावली परिसरातील बौद्ध बांधव, महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला पाहुणे म्हणून आयु महादेवरावजी गडलिंग, दादारावजी देवघरे मोझरी, Pravin ji Patil Amravati, Ajayraoji Chate Pune, Bhartiy बौद्ध सभेचे सिद्धार्थ जी Mundre उपस्थित होते उपस्थितांनी स्मृतीशेष अंबादासजी हरीभाऊ टाले यांच्या सामाजिक व धार्मिक कार्याची आठवण काढत त्यांना विनम्र अभिवादन केले. उपस्थित भंते यांना आयु. साधना अंबादासजी Tale,Priyanka Prashant Tale, Pranita Pravin Patil, Swati Ajayrao Chate परिवाराने भोजन दान, चिवार दान करून अभिवादन केले
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी टाले परिवाराने सर्व उपस्थितांचे आभार मानले तसेच जीवक बुद्ध विहार cha सर्व उपासक उपासीका आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.अशा या धार्मिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते.












