मतदारसंघ लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांची यात्रा नियोजनबाबत संयुक्त सभा
चांदुर रेल्वे: तालुक्यातील अमरावती जिल्ह्यात महाराष्ट्रातील श्री विठोबा संस्थान,सावंगा विठोबा हे अवधूत सांप्रदायाचे सुप्रसिद्ध संस्थान असून लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान आहे. येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना अनियमित बससेवा,अवैध वाहतूक,अरुंद आणि अपघातग्रस्त रस्ते,वैद्यकीय सेवा,वाहन पार्कींग सुविधा, सुलभ सौचालय अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.त्याकरिता बुधवार दि.२१/१/२०२६ रोजी संस्थान संबंधित तीर्थक्षेत्राचे दृष्टीकोनातून समस्या बाबत वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांना संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे यांनी संस्थान समस्या बाबत लेखी निवेदन देवून सविस्तर चर्चा करण्यात आली, तसेच दि.१९ मार्च २०२६ रोजी संस्थानचा गुढीपाडवा भव्य यात्रा महोत्सव आयोजित असून यात्रा सुयोग्य नियोजन संदर्भात या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याबाबत सुद्धा चर्चा करण्यात आली.












