तर ग्रामीण भागातील मालमत्तेवर 50% मुभा देण्याचे अध्यादेश
चांदुर रेल्वे:- मागील अनेक वर्षापासून नगरपालिकेचे वतीने शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या मालमत्तेवर दर महिन्याला दोन टक्के कर लावण्यात येत आहे, त्यामुळे मालमत्ते वरील मूळ रकमेपेक्षा जास्त व्याज च शहरात राहणाऱ्या नागरिकांना कर च्या स्वरूपात भरावे लागत आहे,हे कर नसून सुलतानी कर असल्याचे शहरात राहणाऱ्या नागरिक म्हणत आहे,
तर हल्ली शासनाच्या वतीने राज्यातील ग्रामपंचायतींच्या थकीत करवसुली ला वेग देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत. ग्रामीण भागातील रहिवासी नागरिकांच्या मालमत्ता कर (घरपट्टी), पाणीपट्टी आणि अन्य करावर एक रकमी भरल्यास ५० टक्के सवलतीने देयक वसूल करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ही योजना ३१ डिसेंबरपर्यंत लागू राहणार असून सर्व जिल्हा परिषदेना ऑनलाइन प्रणालीद्वारे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कर भरताना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसून येते अशीच योजना शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील संपूर्ण नगरपालिके करिता आणल्यास नक्कीच शहरी भागातील लोकांना सुद्धा याचा फायदा मिळू शकतो,
ग्रामपंचायतीचे आर्थिक स्वावलंबन हे समृद्ध गावाचे निर्मितीसाठी आवश्यक असल्याने तसेच शासनाच्या सर्व योजनेची प्रभावी अंमलबजावणी यासाठी शासनाने संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान रावीत आहे, सदर अभियान राबवित असताना अनेक ग्रामपंचायतीकडे कराची वसुली प्रलंबित असल्याचे आणि ग्रामपंचायत कडून अनेक करा बाबत नियमाने 100% कर वसुली होत नसल्याची बाब शासनाच्या निर्देशांना आली आहे या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत थकीत कर वसुलीला गती देण्यासाठी ग्रामपंचायत कडून ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मालमत्ता पाणीपट्टा आणि दिवाबत्ती कर इत्यादी कराची रकम एका दमाने भरल्यास या कराच्या एकूण थकबाकीचे 50 टक्के रक्कम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत माफ करण्यात आली आहे,
शहरी भागात राहणाऱ्या नागरिका करिता अशी कोणती योजना नसून तेथील नागरिकांना मात्र आताही नगरपालिकेला सुलतानी कर स्वरूपात कर भरावे लागत आहे, ही योजना शहरी भागात राबविण्यात यावी असेही शहरी भागात राहणारे नागरिकांचे म्हणणे आहे,
३१ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत
एक रक्कम कर भरल्यास ५० टक्के सवलत मिळणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, ग्रामपंचायतींच्या महसुलात वाढ व्हावी व प्रलंबित निधीची उभारणी व्हावी हा यामागील मुख्य हेतू आहे.
ही योजना चांगली असून शहरी भागातील नागरिकां करिता सुद्धा अशी योजना शासनाने राबवावी,
निशिकांत देशमुख, नागरिक,
नगरपालिकेचे वतीने करा व 50 टक्के व्याज लावणे हे चुकीचे आहे माझ्यावर 73887 रु नगरपालिकेचे कर असून,त्यामध्ये 46129 रु व्याज लावण्यात आले आहे, अशी योजना राबवल्यास आम्ही सुद्धा नक्कीच हे कर भरून टाकू,
हर्षराज बागमार व्यापारी













