इंदिरा चौक आर्वी येथे भर दिवसा भाजी मार्केटमध्ये दाेन इसमांना बेदम मारहाण. त्यातील एक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी ; सेवाग्राम येथे रेफर.

0
26
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, प्रतिनिधी/पंकज गोडबोले

आर्वी : इंदिरा चौक येथील एक नाही दोन नाही तर तब्बल तीन इसमावर मानसिक रोगिने सहा इंची जाड असलेल्या पडफ्यानी जीव घेईपर्यंत मारहाण मारेकरी- मथुरेश गजानन लाडके उर्फ मत्या, वय (२२) वर्ष (नेताजी वार्ड) येथील राहणार असून हा घरून स्वतःच्याच आजीची गच्ची दाबून मारण्याचा प्रयत्न केला परंतु आरडा ओरडा झाल्याने काही वार्डातील नागरिकांनी हटकवले तिथेच मानला नसून सकाळीच ८ वाजताच्या सुमारास नागोळ्या अवस्थेत घराबाहेर निघून नेताजी वार्डातीलच राजू गुप्ता यांच्या बाहेर खेळत असलेल्या मुलाची सुद्धा गच्ची दाबून मारण्याचा प्रयत्न केला गच्ची दाबत दिसला असल्याने गुप्ता परिवाराने आरडा ओरड करून कसं बस ८ वर्षाच्या मुलीला वाचवण्याचं प्रयत्न केला तसेच वार्डातील नागरिकांनी आरडा ओरडा करत मथुरेश लाडके यांच्या डोक्यात फरक पडल्याचे सांगत होते. तसेच हातात पडपा घेऊन इंदिरा चौक कडे शिरला असता गभने यांच्या घराजवळ भर रस्त्यावरच रामकृष्ण श्रावण राऊत वय (७०) वर्ष राहणार हनुमान वार्ड आर्वी यांना डोक्यावर पडपा मारून जागेवरच ठार केले. तर इंदिरा चौक भाजी मार्केटमध्ये रामराव महादेव वांगे वय (८५) राहणार मारुती वार्ड आर्वी हे स्वतःच्या शेतातील माल विक्री करिता दलाली मध्ये आले होते. यांच्यावर सुद्धा अचानक येऊन डोक्यावर पडप्यानी जीव घेनी हमला केला तसेच मार्केटमधील नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली असता तसेच जखमी इसमांना पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले तसे डॉक्टर खाऊशी तपासणी केली असता त्यातील एक मृत घोषित केले तर दुसऱ्या जखमी असलेल्या रामराव वांगे नामक व्यक्तीवर प्रायमरी उपचार करून गंभीर जखमी असल्याने सेवाग्राम येथे रेफर करण्यात आले.

तसेच काही नागरिकांनी मारेकरी मथुरेश लाडके याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर सुद्धा हमला करण्याचा प्रयत्न केला परंतु काही ५०-६० लोकांनी मोठ्या हिमतीने पुढाकार घेऊन आरोपीला दोरीने बांधून पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच पोलिसांनी नागरिकांच्या साहाय्याने पोलीस स्टेशन आर्वी येथे आणले असता आर्वीचे ठाणेदार सतीश डेहणकर यांच्या मार्गदर्शनात फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपीला अटक करून गुन्हा नोंद केला.

व मथुरेश लाडके हा मानसिक रोगी असल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश डेहनकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

veer nayak

Google Ad