आजचा सशक्त युवक हा राष्ट्राचा भाग्यविधाता आहे…… ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे. धामणगाव रेल्वे

0
49

डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्नित श्री संत शंकर महाराज आश्रम ट्रस्ट पिंपळखुटा द्वारा संचलित श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा ,तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा. अमरावती राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर दत्तकग्राम मंगरूळ दस्तगीर संत लहानुजी महाराज जन्म ठिकाण या ठिकाणी आयोजित केले असून या कार्यक्रमांमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहे. आज राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील युवकांसाठी विशेष व्याख्यान आयोजित केले होते .आजचा सशक्त युवक व संघटन शक्ती या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक ग्रामगीताचार्य माऊली दास हनुमंत ठाकरे उपस्थित होते. तसेच प्राध्यापक दीपक बोंद्रे ,पवन शिवरकर उपस्थित होते. श्री संत लहानूजी महाराज यांच्या जन्म ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून माऊली दास श्री हनुमंत ठाकरे ग्रामगीताचार्य आपल्या व्याख्यानातून म्हणाले की राष्ट्राचा सशक्त युवक हा राष्ट्राचा भाग्यविधाता आहे. राष्ट्राला सशक्त करण्यासाठी आज युवक सुसंस्कार संपन्न असणे काळाची गरज आहे . परंतु आपण पाहतो आहे की आजचा युवक हा व्यसनाधीनतेमध्ये गुरफाटलेला आहे मोबाईलच्या अतिवापरामुळे व विविध व्यसनांमुळे आज तो कुटुंबापासून दुरावलेला आहे आज विविध ठिकाणी वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे या मागचे कारण आजचा युवक हा दिशाहीन झालेला आहे त्याला चांगले काय आणि वाईट काय यामधलं भानच राहिलेले नाही आहे नशेच्या आहारी जाऊन अनेक युवकांनी आपले जीवन गमावलेले आहे त्यालाच सशक्त करण्यासाठी आज संत विचारांची व चांगल्या विचारांची आवश्यकता आहे म्हणूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मते हत्तीस आवरी गवती दोर मुंग्या ही करती सरपास जर जर व्याघ्र सिंहासि फाडती रान कुत्रे संघटुनियाअसे संघटनेचे महत्त्व सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्याप्रमाणे संघटना सांगितले की एक युवक समर्थन कोणी करणार नाही परंतु चांगल्या युवकांची जर संघटना असेल तर कोणतीही कार्य असो ते पूर्णत्वास गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून संघटना महत्त्वाची आहे .आई-वडिलांची सेवाकरणे, व्यसनापासून दूर राहणे, राष्ट्राचे आपण आधारस्तंभ होण्याची जाणीव असणे, सशक्त समाजाची निर्मिती करण्यासाठी सशक्त युवकाची आवश्यकता आहे. युवक सशक्त असेल तर समाजाची सेवा करू शकेल. शेतकरी हा विश्वाचा देव आहे शेतीमध्ये राब राब राबवून कष्ट करून अन्नधान्य पिकवतो व राष्ट्राला अर्पण करतो म्हणूनच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ग्रंथ ग्रामनाथाला म्हणजेच या शेतकऱ्याला अर्पण केला आहे. आपण सर्व शेतकऱ्याचीच लेकरं आहो आणि शेतकऱ्यांसाठीच काम करणार आहो म्हणून संपूर्ण जीव ओतून आजच्या कृषी सेवकांनी शेतकऱ्याला तन-मन-धनाने सहकार्य करण्याची गरज आहे तरच आपल्या जन्माचा सार्थक झाले असे आपण समजावे असे प्रतिपादन आपल्या व्याख्यानातून केले.

संत गाडगे महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,स्वामी विवेकानंद बाबा आमटे, सावित्रीबाई फुले, साधनाताई आमते ,सिंधुताई सपकाळ यासारख्या समाजसेवकांची विविध उदाहरणे देऊन जीवनामध्ये आदर्श निर्माण कसा करावा हा संदेश आजच्या युवकांना आपल्या भाषणांमधून ग्रामगीताचार्य माऊली दास हनुमंत ठाकरे यांनी दिला. कार्यक्रमाच्या शेवटी गेले सांगून गाडगेबाबा या गीताने सांगता करण्यात आली. दत्तकग्राम मंगरूळ दस्तगीर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी समाजप्रबोधन पर व्यसनमुक्ती ग्राम स्वच्छता शिक्षण हुंडाबळी अशा विविध विषयावर पथनाट्य सादर केले युवक हा समाजासाठी कसा उपयोगाचा आहे व्यसनांपासून कसे दूर राहावे समाजामध्ये कोणकोणत्या उपाययोजना करून समाज सशक्त करता येईल यासाठी आजच्या युवकांनी मंगरूळ दस्तगीर गावांमधील चौकात चौकामध्ये संदेश देण्याचे महत्त्वाचे कार्य या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून प्रबोधन केले आहे. शिबिरामध्ये गावातील युवक सहभागी होऊन शिबिरामध्ये युवक यांच्या समन्वयाने कार्यक्रम आदर्श रित्या पार पडला. हम तरुणही हिंद के खेलते है अंगार से लढते है तलवार से मगर जीतते है प्यार से मगर जिते है प्यार से असा नारा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

veer nayak

Google Ad