आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : स्थानिक देऊरवाडा येथील मॉडेल हायस्कूल मध्ये दिनांक 12आणि 13 डिसेंबरला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनीचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी आर्वी माननीय श्री विश्वासजी शिरसाठ साहेबांनी केले . त्यामध्ये प्राथमिक ,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक असे तीन गट करण्यात आले होते तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद केंद्र शाळा वाढोना येथील विद्यार्थीनि कु. आराध्या अमोल लांडे आणि कु. विद्या सुनील भांगे वर्ग चौथा यांनी प्राथमिक गटामध्ये जलसंवर्धन व जल व्यवस्थापन या विषयाअंतर्गत प्रतिकृती सादर केली . परीक्षकांसमोरही उत्कृष्ट सादरीकरण केले. दिनांक 13 डिसेंबरला झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमांमध्ये मा.गटशिक्षणाधिकारी श्री. पंकजजी तायडे , भारत शिक्षण संस्थेच्या ॲड .शोभाताई काळे, विस्तार अधिकारी सौ गीता ताई मानमोडे तथा अजयजी इंगोले आयोजक शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रफुलकुमार ठाकरे ,केंद्रप्रमुख श्री संजयजी कोहचाळे सर यांच्या हस्ते प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र ,स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कु.भारती एकनाथ सानप यांच्या मार्गदर्शना खाली वरील प्रतिकृतीचे विद्यार्थिनींनी सादरीकरण केले.

यशस्वी विद्यार्थिनींचे शाळेचे मुख्याध्यापक श्री उमेशकुमार केळूत सर , सहाय्यक शिक्षिका कु. प्रज्ञा बागेसर तसेच सहाय्यक शिक्षक श्री योगेश बोबडे सर तसेच पालक तथा शाळा व्यवस्थापन समिती यांनी अभिनंदन व कौतुक केले केले.










