धामणगाव येथे महाराणा प्रताप जयंतीनिमित्त भव्य रॅली उत्साहात संपन्न

0
0

धामणगाव : आज धामणगाव शहरात महाराणा प्रताप जयंतीनिमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून करण्यात आली. त्यानंतर सासरी चौक, गांधी चौक, बायपास मार्गे महाराणा प्रताप चौक येथे रॅलीची सांगता करण्यात आली.

यावेळी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयराव भैसे साहेब, दत्तापूर पोलीस ठाणेदार गिरीश सर, बच्चू ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते बाबा ठाकूर, नरसिंग भाऊ खंडार, गोकुल ठाकूर, , नारायणसिंग ठाकूर, अमर ठाकूर, सुरजसिंग ठाकूर यांच्यासह समाजातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रॅलीदरम्यान परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले असून महाराणा प्रताप यांच्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले.

veer nayak

Google Ad