नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची भाजयुमो जिल्हाध्यक्ष व महामंत्री यांनी घेतली सदिच्छा भेट.

0
0

आपल्या जिल्ह्याला नवनिर्वाचित तरुण जिल्हा पोलीस अधीक्षक लाभले असून आता जिल्ह्यातील सर्व जनतेचे लक्ष त्यांच्या कार्यावर लागलेले आहे,अविस्मरणीय अशा कामगिरी मुळे चर्चित असलेले पोलीस अधीक्षक आपल्या जिल्ह्याला लाभले आहे. त्यांची अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक येथे बदली झाल्यामुळे जिल्ह्यातील जनता ही त्यांच्याकडे लक्ष लावून आहे, त्याच निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन इंगळे तसेच महामंत्री तुषार धनजोडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम साहेब यांच्या सोबत जिल्ह्यामध्ये चांगले वातावरण निर्माण व्हावे व तरुण पिढी व्यसनाधीनते पासून दूर राहावी यासाठी उपाययोजना करण्याचे साकडे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना घातले. चर्चा करत असताना जिल्ह्यामध्ये 2017 साली असेच कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब आपल्या जिल्ह्याला लाभले होते अशी चर्चा सुद्धा झाली. त्यानंतर आता आपल्या जिल्ह्याला एक कर्तव्यदक्ष अधिकारी निकेतन कदम साहेब मिळाले. हे नक्कीच जिल्ह्याला पूर्ववत चांगले दिवस आणतील अशी त्यांनी ग्वाही दिली.

veer nayak

Google Ad