आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : इंडियन रेड क्रॉस सोसायटी आर्वीने शालेय विद्यार्थ्यांसाठी दंत आणि सामान्य आरोग्य तपासणी शिबिराचे नारायणराव वाघ माध्यमिक शाळा व जिल्हा परिषद उच्च पाथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी केली.
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अरुण पावडे,स्त्री रोग तज्ञ डॉ. प्रतिभा पावडे, डॉ. अभिलाष धरमठोक, डॉ.देवेंद्र खंडेलवाल, डॉ. उमेश गुल्हाने, डॉ सुभाष बुधवानी,डॉ.भूषण अग्रवाल यांनी तपासनी केली. इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य प्रा रमेश जवंजाळ,रवी शहा, अरुण ढोक, प्रेमसिंग राठोड, प्रमोद पाटणी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने शिबिरात योगदान दिले.
नारायणराव वाघ शाळेतील ७० विद्यार्थी आणि चिंचोली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळातील ५६ विद्यार्थ्यांची, एकूण १२६ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाला नारायणराव वाघ शाळेच्या मुख्याध्यापिका सूर्यवंशी, श्री. गोविंद सावरकर, जाधव बाबू, शिक्षकेत्तर कर्मचारी हिवाळे, काळे, नरेश गोंदाणे त्याच प्रमाणे जि. प. शाळेचा मुख्याध्यापिका कुमारी जाधव, जयस्वाल मॅडम व घाटोळे सर आदिनी सहकार्य केले.










