चांदुर रेल्वे शहरामध्ये वीज वितरण कंपनीचा खेळ खंडोबा. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त!

0
0

वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे वीज उपकरणे जळत असल्याने नागरिक संतप्त

                             चांदुर रेल्वे शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येबाबत शहर युवक काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे निवेदन देण्यात आले. शहरातील नागरिकांना सततच्या वीज खंडित समस्येमुळे मोठा त्रास सहन करावा लागत असून तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. शहरातील नागरिक तसेच छोटे-मोठे दुकानदार अशा अनेक लोकांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे यामुळे झेरॉक्सच्या मशिनी, सिलिंग फॅन, फ्रिज अशासारखे उपकरणे जळत आहे ज्यामुळे लोकांना हा त्रास सहन करावा लागत आहे यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण चांदुर रेल्वे येथील इंजिनिअर स्थूल साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले.                

                               यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येईल असे स्थूल साहेब यांनी सांगितले निवेदन देताना माजी नगराध्यक्ष शिट्टु दादा सूर्यवंशी, शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष निवास भाऊ सूर्यवंशी, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष रुपेश पुडके, स्वप्निल मानकर,सारंग, देशमुख सागर गरुड, अजय देसाई, अर्जुन सरदार तेजस वानखडे, आर्यन वणवे तसेच काँग्रेस कमिटीचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

veer nayak

Google Ad