चांदुर रेल्वेतून सावंगी मेघे रुग्णालयासाठी रुग्णसेवा बसचा शुभारंभ दर गुरुवार, शुक्रवार व शनिवार सेवा उपलब्ध; रुग्णांच्या प्रवासखर्चात मोठी बचत

0
32

चांदुर रेल्वे : आज दिनांक ५ मार्च २०२६ रोजी चांदुर रेल्वे येथून दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित सावंगी मेघे येथील रुग्णालय समूहासाठी रुग्णसेवा बसचा शुभारंभ करण्यात आला. या बससेवेचा लाभ चांदुर रेल्वे शहर व तालुक्यातील रुग्णांना होणार असून त्यांच्या प्रवासखर्चात मोठी बचत होणार आहे.

दत्ताजी मेघे तसेच सागर मेघे यांच्या सहकार्यामुळे ही सेवा सुरू करण्यात आली. सकाळी ८ वाजता चांदुर रेल्वे नगरपरिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती श्री. अनिलजी मोटवानी यांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले. यावेळी बस चालक श्री. सतीश भाऊ यांना हिरवी झेंडी दाखवून बसचे उद्घाटन करण्यात आले.

सदर बस सेवा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिस्ट सेंटर, सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल तसेच महात्मा गांधी आयुर्वेदिक रुग्णालय येथे उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांसाठी उपलब्ध राहणार आहे.

कोरोना काळात बंद पडलेली ही रुग्णसेवा बस आता पूर्ववत सुरू करण्यात आली असून दर महिन्याच्या प्रत्येक गुरुवार, शुक्रवार व शनिवार ही सेवा उपलब्ध राहणार आहे.

चांदुर रेल्वे शहर व तालुक्यातील अनेक रुग्ण सावंगी मेघे येथे उपचारासाठी जातात. वाहतुकीचा वाढता खर्च व वाहनांची अपुरी उपलब्धता यामुळे रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही गरज लक्षात घेऊन नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रसन्न पाटील यांनी संबंधित मान्यवरांकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार रुग्णालय प्रशासनाने तातडीने निर्णय घेत ही सेवा सुरू केली.

या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष श्री.निलेशभाऊ सूर्यवंशी, गजू भाऊ यादव, गुड्डू भाऊ बजाज, मुन्ना भाऊ शर्मा, रुपेश भाऊ पुडके, जयंत भाऊ शेळके, नितीन भाऊ रोकडे, वार्ताहर श्री. सुभाष भाऊ कोटेजा, पप्पू भाऊ पाटील, अमीर भाऊ पठाण तसेच शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्यसेवेपर्यंत सहज व परवडणारी सुविधा उपलब्ध होणार असून नागरिकांनी मेघे परिवार व रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले आहेत.

veer nayak

Google Ad