चांदुर रेल्वे / स्थानीय खरेदी विक्री च्या वतीने नाफेडद्वारे हमी भावने चणा खरेदी चा शुभारंभ ता 10 मंगळवार रोजी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडाऊन मध्ये सुरुवात करण्यात आली,
यावेळी दोन शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.5875/ रु हमी भावाने चणा खरेदी करण्यात आली. तर तालुक्यात 7910 हेक्टर मध्ये चना पिकाची पेरणी करण्यात आल्याचे समजते,
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश आरेकर,संस्थेचे अध्यक्ष श्री गोविंदराव देशमुख,उपाध्यक्ष पंकज शिंदे,मानस सचिव अशोकराव चौधरी,प्रवीण चिंचे,नितीन कोपरकर पवन चौधरी,दिनेश ठाकरे,संजय डुकरे,सुरेंद्र नेरकर,सुनील गावंडे,सतीश धरम-केले, गजानन घुरडे,प्रेमदास रामटेके, सविता गावंडे,सरिता देशमुख,सुधीर नलगे,हरि ठाकरे सर्व संचालक मंडळ, तसेच ग्रेडर म्हणून मनीष टेकाडे,सह कर्मचारी वर्ग उपस्थित होते.













