चांदुर रेल्वे / वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेश अध्यक्ष डॉ निलेश विश्वकर्मा मागील अनेक वर्षा पासून आपला वाढदिवस कोणताही गाजावाजा न करता विविध सामाजिक उपक्रमातून साजरा करत आहे
ता 9 सोमवार रोजी डॉ निलेश विश्वकर्मा यांच्या वाढदिवसा निमित्त कार्यकर्त्यांनी सकाळी ग्रामीण रुग्णालय येथे डॉक्टरांच्या उपस्थितीत रुग्णांना फळ वाटा सोबत सुरचित् जेवणाचे डबे वाटप करण्यात आले तर सायंकाळी सात वाजता सोनगाव येथील मूकबधिर विद्यार्थ्यांसोबत स्वतः डॉ निलेश विश्वकर्मा उपस्थित राहून त्यांच्यासोबत वेळ घालून त्यांना अल्प उपहारा चा वाटप करून आपला वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्य व अनेक कार्यकर्ते हजर होते












