चांदूर रेल्वे | प्रतिनिधी
चांदूर रेल्वे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रा. प्रियंका ताई निलेश विश्वकर्मा यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहरात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या निवडीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रा. प्रियंका ताई निलेश विश्वकर्मा या अभ्यासू, संयमी आणि संवेदनशील नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. सामाजिक, शैक्षणिक व नागरी प्रश्नांबाबत त्यांचा सक्रीय सहभाग नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली चांदूर रेल्वे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना त्यांनी सांगितले की, “चांदूर रेल्वेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असून, नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल.”
या निवडीबद्दल आपलं चांदूर पॅनल व निलेशभाऊ विश्वकर्मा मित्रमंडळ, चांदूर रेल्वे यांच्यावतीने तसेच विविध सामाजिक संघटनांकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
नव्या नेतृत्वामुळे शहरातील विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.















