जुना धामणगाव वॉर्ड क्रमांक ५ मधील नाल्यांच्या समस्येकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष – नागरिकांचा आक्रोश

0
62

जुना धामणगाव (ता. धामणगाव रेल्वे, वॉर्ड क्रमांक ५ मधील नाल्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कडू पुरा येणारी नाली, रामदास धुंडसे यांच्या घराकडून जाणारी नाली, तसेच राजू गोपाळ यांच्या घराकडील नाली अनेक दिवसांपासून बंद असून सांडपाणी घरासमोर साचत आहे. यामुळे परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे.

संदीप काळसरफे यांच्या घराकडून जाणारी नालीचे सांडपाणी रस्त्यावर साचत असून अंगणवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्यामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात तर नाल्यांची परिस्थिती आणखी गंभीर बनते, घरासमोर सांडपाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.

स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत व संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही आजतागायत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. परिणामी, नागरिकांनी सामूहिक अर्ज करून ग्रामसेवक व पंचायत समिती अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, “ग्रामपंचायत वेळेवर दखल घेत नाही, त्यामुळे आमच्या आरोग्यावर व जगण्यावर संकट येत आहे. अंगणवाडी परिसरातील लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले असून तातडीने नाले दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे.”

अर्जावर वॉर्डातील नागरिकांनी एकत्र येऊन सही केली असून समस्या लवकर न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

veer nayak

Google Ad