दिनांक: २४/०१/२०२६
एस ओ एस कब्स येथे उत्साहपूर्ण वातावरणात आजी आजोबा दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थांना आजी- आजोबांचे महत्व समजावून सांगणे. आणि विद्यार्थ्यांमध्ये कृतज्ञतेची भावना निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आजी- आजोबांचे तिलक आणि पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले आणि सेल्फी स्टँड वर सर्वांचे फोटोज् घेण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून *नवनिर्वाचित नगरसेवक मा.श्री. जगदीश जी रॉय आणि सरप्राइज पाहुणे म्हणून श्रीमती सुमनताई गोटेफोडे लाभले होते* . पाहुण्यांचे वेलकम कार्ड आणि सॅपलिंग देऊन स्वागत करण्यात आले. *प्रि. प्रायमरी हेड मा. शबाना खान आणि मुख्याध्यापिका मा. प्रचिती धर्माधिकारी* यांनी आपल्या भाषणातून सर्व आजी- आजोबांचे स्वागत केले आणि जीवनातील आजी आजोबांचे महत्व स्पष्ट केले. त्यानंतर के जी २ च्या चिमुकल्यांनी आपल्या नाटिकेतून आजी आजोबांचे महत्व स्पष्ट केले आणि मोबाईल वरच्या गेम पेक्षा आजी- आजोबांची गोष्टच बरी असे समजावून सांगितले. *सान्वी घाडगे आणि अनय मानकर* हे विद्यार्थी आजी आजोबा च्या वेशभूषेत आले होते.
आजी- आजोबांसाठी मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. आजी- आजोबांनी उत्स्फूर्तपणे खेळात सहभाग घेतला. खेळामध्ये फॉलो द कलर्स , कंप्लीट द फेस (गेम), वरमाला घालने, आणि पासिंग द चेअर, हे खेळ घेण्यात आले. उत्साहाने सर्व आजी- आजोबांनी खेळ खेळले, कंप्लीट द फेस या खेळात ( १) श्री. प्रकाश जी लोहे,(२) श्री अशोकजी राठी, (३) सौ संगीता राठी विजयी ठरले.
वरमाला घालणे या खेळात (१) श्री. आणि सौ. भंडारी,(२) श्री. आणि सौ. भोंगे,(३) श्री. आणि सौ. रोंघें विजयी ठरले. आणि पासींग द चेअर या खेळामध्ये आजोबांचा ग्रुप विजयी ठरला सर्व विजयी स्पर्धकांना भेटवस्तु देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व आजी आजोबांनी खूप मज्जा केली. *सौ. संध्याताई लोहे आणि प्रमुख पाहुणे श्री. जगदीशजी रॉय यांनी सुंदर असे गीत सादर केले.* आजी- आजोबांनी आपले विचार व्यक्त केले प्राथमिक शिक्षक श्री. गौरव देवघरे यांनी आजी- आजोबांच्या सन्मानार्थ सुंदर असे गीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका वर्षा देशमुख आणि अश्विनी नांदणे यांनी केले तर आभार शिक्षिका विशाखा मेंढे यांनी मानले. कार्यक्रमाचा शेवट वंदे मातरम् ने झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन *प्रि. प्रायमरी हेड मा. शबाना खान* यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका प्रणिता जोशी, रेणुका सबाने, वर्षा देशमुख, आकांक्षा महल्ले, विशाखा मेंढे, अश्विनी नांदणे, स्नेहल दुर्गे, ऋचा अल्वाडकर आणि सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.











