आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी : स्थानिक पीएमश्री गांधी विद्यालयात दिनांक 7 एप्रिल सकाळी ड्रॉइंग हॉलमध्ये एनसीसी छत्र सैनिकांचा सत्कार सोहळा संपन्न झाला या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी स्वातीताई गुल्हाने अध्यक्ष, नगर परिषद आर्वी तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून उपविभागीय अधिकारी श्री विश्वासजी शिरसाठ , श्री गौरव भैया जाजू उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती नगरपरिषद आर्वी, डॉक्टर ऋषी भाकरे , देवानंद साठे, प्रकाशभाऊ गुल्हाने, प्राचार्य श्री विश्वेश्वर पायले, पर्यवेक्षिका ज्योती ताई अजमीरे,हे होते

एनसीसी छात्र सैनिकांनी एनसीसी गीत म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर कॅडेट गणेश पारडे, वैष्णवी राऊत , कॅडेट मोहम्मद साद ,कॅडेट समृद्धी ढेंबरे यांनी दोन वर्षातील एनसीसीचा अनुभव मान्यवरांसमोर विशद केला त्यानंतर दोन वर्ष कठोर मेहनत करून परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या छत्रसैनिकांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला जानेवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि 23 विद्यार्थी हे अल्फा ग्रेट प्राप्त झाले ही शाळा करता आणि ट्वेंटीवन महाराष्ट्र बटालियन करता सुद्धा एक अभिमानाची बाब आहे. यावेळी एनसीसी मध्ये कोणकोणते फायदे विद्यार्थ्यांना होतात आणि प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे पुढे कुठले क्षेत्रात कशाप्रकारे आपल्या शाळेचे नाव उज्वल करू शकतात याबद्दल महत्व विशद केले सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली करता शुभेच्छा आणि त्यांच्या अभिनंदन केले. शाळेचे माजी विद्यार्थी असलेले डॉक्टर ऋषी भाकरे यांनी सुद्धा आज जागतिक आरोग्य दिना विषयी माहिती आणि एनसीसीमुळे त्यांना काय फायदे झाले ते त्यांच्या भाषणातून सांगितले उपाध्यक्ष शिक्षण समिती गौरवजी. जाजू तसेच अध्यक्ष स्वाती ताई गुल्हाने यांनी एनसीसी छात्र सैनिकांना भविष्यात शूटिंग रेंज उपलब्ध करून देण्याबद्दल सुद्धा आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी अधिकारी प्रमोद नागरे तर आभार प्रदर्शन श्री संजय किटे यांनी मानले.












