धामणगाव रेल्वे, चैत्र नवरात्र उत्सव २०२६ आज दि. १९ मार्च २०२६ पासून तर २८ मार्च २०२६ (गुरुवार, चैत्र शुद्ध प्रतिपदा ते शनिवार, चैत्र शुद्ध दशमी) स्त्रिपुरा त्रिशक्ती पीठ, आदिमाता शक्ती प्रतिष्ठान, विरुळ रोंघे, ता. धामणगाव रेल्वे, येथे चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

नवरात्र उत्सव निमित्त दि.१९ मार्च २०२६ गुरुवार प्रतिपदेला पहाटे ६.४५ ला आरती महाअभिषेक व सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत महाभिषेक तसेच सायंकाळी ५ ते ७ घटस्थापना व आरती २० मार्च २०२६ शुक्रवार ला पहाटे ६.४५ आरती सकाळी अभिषेक २१ मार्च शनिवार ला पहाटे आरती त्यानंतर दुपारी अकरा वाजता श्री आईची बैठक दुपारी तीन ते सहा भजन आणि सायंकाळी आरती २२ मार्च रविवारला शनिवार प्रमाणेच कार्यक्रम राहणार असून २३ मार्च सोमवारला सुद्धा आरती अभिषेक आईची बैठक सप्तशती पाठ सायंकाळची आरती आणि भजन आयोजित करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे २४ मार्च २०२६ मंगळवार ला पहाटे ६.४५आरती, श्री आईची बैठक भजन (पुरुष भजन मंडळ, विरुळ राधे) व सायंकाळी ६.४५ ते ७.४५आरती व ध्यान साधना.२५ मार्च २०२६ बुधवारी पहाटे ६.४५,श्री आईची बैठक सायंकाळी ६.४५ आरती व महाअभिषेक होणार आहे. २६ मार्च २०२६ गुरुवारी १००१ पानांचे तांबूल प्रसाद कांडन,सायंकाळी ७.३० ते ११.३० : महायज्ञ व रात्री साडेअकरा वाजता महाआरती व अष्टमी विशेष सोहळा आणि श्री आईचे विविध रूप दर्शन सोहळा होणार आहे.
दि.२७ मार्च २०२६ शुक्रवार नवमीला आरती सायंकाळी ६.४५ ला आरती व भजन संध्या तसेच सायंकाळी ७ ते १० पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दि.२८ मार्च २०२६ शनिवारी दशमीला आरती व घट विसर्जन होईल चैत्र नवरात्र उत्सवाच्या या धार्मिक आणि अध्यात्मिक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन त्रिपुरा स्त्रीशक्ती पेठ आदिमाता शक्ती प्रतिष्ठान वेरूळ रोंघे तालुका धामणगाव रेल्वे च्या वतीने करण्यात आलेले आहे. श्री आईच्या बैठकीसाठी सकाळी ११.३० पर्यंत उपस्थित असलेल्या भाविकांचाच क्रमांक घेतला जाईल अशी माहिती प्रतिष्ठानने दिली आहे.
















