मंगरूळ दस्तगीर : सोनोरा काकडा येथील रहिवासी भास्करराव वऱ्हाडे (वय 82 वर्षे) हे बँकेच्या कामानिमित्त मंगरूळ दस्तगीर येथे आले होते. मात्र, मंगरूळ दस्तगीर बस स्टॉप परिसरातून ते बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.
भास्करराव वऱ्हाडे हे दोन्ही डोळ्यांनी आंधळे असल्याने त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. नागरिकांनी सतर्क राहून संबंधित वृद्ध व्यक्ती कुठेही आढळल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क : नरेंद्र भास्करराव वऱ्हाडे
मो. नं. 9370716610













