साई सेवा ट्रस्ट, धामणगाव रेल्वे यांच्या वतीने आयोजित श्री संत साईबाबा ग्रंथाचे संगीतमय पारायण व महाप्रसाद भक्तिभावात संपन्न

0
11

धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी :

श्री संत साईबाबा यांच्या कृपाशीर्वादाने व भाविकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत श्री संत साईबाबा ग्रंथाचे संगीतमय पारायण तसेच महाप्रसाद मोठ्या भक्तिभावात संपन्न झाले. या धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन साई सेवा ट्रस्ट, धामणगाव रेल्वे यांच्या वतीने करण्यात आले होते.

सदर पारायणामध्ये साईबाबांच्या जीवनकार्य, उपदेश व मानवतेचा संदेश संगीतमय स्वरूपात सादर करण्यात आला. भजन, अभंग व आरतीमुळे संपूर्ण परिसर साईनामाच्या गजराने भक्तिमय झाला होता. विविध भागांतून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याचा लाभ घेतला.

पारायणानंतर महाआरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. शिस्तबद्ध व सेवाभावाने पार पडलेल्या महाप्रसादामुळे भाविकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

या संगीतमय पारायण व महाप्रसादाच्या माध्यमातून भाविकांच्या मनात श्रद्धा, शांती व सकारात्मक ऊर्जेचा अनुभव आला. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सेवेकरी व भाविकांचे साई सेवा ट्रस्ट, धामणगाव रेल्वे यांच्या वतीने आभार मानण्यात आले.

veer nayak

Google Ad