सार्वजनिक गो रक्षा समिती धामणगावच्या वतीने आज सोमवारला भव्य रॅली;  श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून प्रारंभ…समस्त गौप्रेमींना रॅलीमध्ये येण्याचे आवाहन 

0
5

धामणगाव रेल्वे,

गाईला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यासाठी, वाढती गोहत्या आणि गोतस्करी थांबवण्यासाठी, तसेच नवीन कठोर कायदे करण्यासाठी, संपूर्ण भारतात एक देशव्यापी आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या अभूतपूर्व आंदोलनाच्या अनुषंगाने सार्वजनिक गौ रक्षा सेवा समितीने धामणगाव शहरात एक जन आंदोलन आयोजित केले आहे या माध्यमाने आज सोमवारला सकाळी १० वाजता भव्य दिव्य रॅलीचे आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहे

सदर रॅली धामणगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मुख्य मार्गाने तहसील कार्यालय येथे पोहोचून शासनाला निवेदन सादर करणार आहे

गौरक्षकांनी आवाहन केले आहे की, सदर रॅली कोणत्याही राजकीय पक्षाची नाही, किंवा कोणत्याही जाती-धर्माची नाही. ही रॅली त्या प्रत्येक व्यक्तीची आहे, जो गाईला राष्ट्रमाता आणि आपली आई मानतो. म्हणूनच समितीच्या वतीने सर्व बंधू-भगिनींना रॅलीमध्ये सामील होण्याकरिता आवाहन करण्यात आले आहे.

नमूद करताना गौरक्षकांनी म्हटले आहे की,आता नाही तर कधीच नाही. मोठ्या संख्येने रॅलीत पोहोचून गाईच्या दुधाचे आणि आशीर्वादाचे ऋण फेडायचे आहे.

veer nayak

Google Ad