त्यात त्यांनी म्हटलं की शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते म्हणून त्यांनी आपले मुकुट समर्थ रामदास स्वामींना सोपवले व म्हटले की आता हे राज्य तुम्ही सांभाळा. समर्थांनी त्या मुकूट चा स्वीकार केला आणि म्हटले की तुम्ही माझे शिष्य आहात ना! राजांनी हो म्हटले. समर्थ म्हणाले तर मग तुम्ही माझा आदेश माना आणि हे राज्य माझ्या तर्फे तुम्ही सांभाळा. याचा अर्थ काय? याचा अर्थ हाच होतो की सत्ताधारी पेक्षा ही संत गुरु यांचा सत्तेवर अधिकार प्रथम असतो हे तर यांना दाखवायचे नाही ना !
इतिहासात अशा कोणत्याही संदर्भाचा उल्लेख मी वाचलेला नाही. यातून एकच निष्कर्ष निघतो की, या स्वयंभू बाबा किंवा धर्मगुरूंना आपलं वर्चस्व सत्ताधाऱ्यांवर काल ही होतं आणि आज ही आहे याची जाणीव तर लोकांना किंवा सत्ताधाऱ्यांना करून द्यायची नाही ना! कमालच आहे राव या बाबा लोकांची, काय काय उदाहरणं कुठून कुठून शोधून काढतात, आणि तेही केवळ आपले वर्चस्व स्थापित करण्यासाठी !! उत्तर रामायणाची काल्पनिक निर्मिती ही अशाच वर्ण व्यवस्थेतील वर्चस्वाच्या उद्देशातून यांच्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवली आहे. कारण त्यातही सत्ताधाऱ्यांवर धर्माचा वर्चस्व असण्यापेक्षा धर्माचार्यांचे वर्चस्व कसे राहील हाच धुर्त डाव रचल्या गेला होता.
श्रीराम पत्रे
Home आपला विदर्भ काल नागपूर मधील एका शिलान्यास कार्यक्रमात बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांचं शिवाजी...











