ग्रामपंचायत पिंपळखुटा येथील गायी चरण्यासाठी राखीव असलेली शासनाची ई क्लास जमीन सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी साठी किंवा अन्य विकास कामांसाठी पिंपळखुटा गाव विकासाच्या कामा व्यतिरिक्त अन्य कोणत्याही गावाला अथवा नगरपरिषदेला देण्यास गावकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. तसा ग्रामसभेत ठराव घेवून मंजूर करण्यात आला. व त्या आशयाचे गावकऱ्यांच्या सह्याचे निवेदन पत्र अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर साहेब कार्यालय अमरावती मा उपजिल्हाधकारी जाधव साहेब महसूल विभाग अमरावती, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय अमरावती , उपविभागीय अधिकारी कार्यालय चांदूर रेल्वे, तहसीलदार अभय घोरपडे साहेब कार्यालय धामणगाव रेल्वे , गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय धामणगाव रेल्वे यांना देण्यात आले. यावेळी पिंपळखुटा गावातील नागरिक श्री सुधीरभाऊ भेंडे (माजी उपसरपंच), प्रदिपभाऊ डेरे ( पिंपळखुटा सेवा सहकारी सोसायटी संचालक),विनोदभाऊ गायके ,सूरजभाऊ गंथडे , प्रदुम्यभाऊ रुद्रकार व गावातील नागरिक हजर होते.
Home आपला विदर्भ अमरावती ग्रामपंचायत पिंपळखुटा गावची राखीव असलेली गट क्र. १२ मधील शासनाची ई क्लास...
















