बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वतीने महामानवास महा वंदना

0
1

अमरावती – राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर रोजी बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली.मनोजभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वातील संघटनेच्या शिष्टमंडळाने असदपूर, शहापूर, सावळापूर, वासनी बोरगांव दुरी, बोरगांव पेठ, बोपापूर अशा अनेक प्रकल्पग्रस्त गावांमध्ये जाऊन महामानवाच्या प्रतिमेचे पूजन व माल्यापर्ण करुन गावातील उपासक बंधू भगिनींना मनोज दादा चव्हाण यांनी बाबासाहेबांचे जिवनचरीत्र व त्यांनी दिलेल्या जागतिक स्तरावर उच्च दर्जाचे महत्त्व प्राप्त अशा राज्य घटनेच्या संदर्भात उपस्थित बंधू

भगिनींना मार्गदर्शन केले.यावेळी संघटनेचे राजुभाऊ लोणकर, सचिनभाऊ ढवळे, संतोष भाऊ नितनवरे, गजानन चिमोटे, दिनेश बडवाई,प्रकाश नांदणे, अभिजित गैरवाल, साहेबराव नितनवरे,उषाबाई नवाळे, बालीताई गोदे, साहेबराव थोरात, आशाताई राऊत, संतोष भाऊ वर्धे, गजानन ठाकरे, राहूल अतकरे,तथा शेकडो बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.

veer nayak

Google Ad