आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : शिवाजी चौक येथे जिजाऊ ब्रिगेड , मराठा सेवा संघाच्या वतीने शिवजयंती महोत्सव साजरा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माला अर्पण करून शिवमय घोषणा देऊन शिवजयंती साजरी करण्यात आली आले. तसेच यावेळी कार्यक्रमला जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्ष सुनिता जाणे, सचिव मायाताई चौधरी, कोषाध्यक्ष अॅड उज्ज्वला चाेकशी, प्रा. विजया मुळे, माया शिरभाते, माया हुड, उपाध्यक्ष ज्योत्स्ना चकोर, तसेच मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजय चौधरी, माजी कार्याध्यक्ष अॅड सुरेन्द्र जाणे, विलासराव हूड, सचीन, प्रशांत ढवळे, डॉ. प्रा. सुधाकर भोयर, डंबारे सर, विजय मारोटकर, समीर खोंडे, डंभारे सर, प्रफुल्ल मनवर, पालेकर सर इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.











