चांदूर रेल्वे/शासनाच्या कार्यालयात वेळेचे काटेकोर पालन करणे अपेक्षित असताना चांदुर रेल्वे येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग येथील कार्यालयात आज धक्कादायक प्रकार सोमोर आला सकाळी तब्बल 12 वाजून ३० मिनिटे उलटूनी संपूर्ण कार्यालयात ओस पडलेले दिसत आहे.

अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असतात नाही कार्यालयातील पंखे आणि दिवे मात्र सुरू असल्याने विजेचा सर्रास गैरवापर होत असल्याचा चित्र पहावयास मिळाले. कामानिमित्त कार्यालयात आलेल्या नागरिकांना मात्र रिकामी खुर्च्या आणि कार्यालयातील विद्युत उपकरणे सुरू असल्याने नागरिकांनी संतप्त व्यक्त केला. कार्यालयात कोणीच नाही तर पंखे दिवे कोणासाठी सुरू ठेवलेले आहे? कोणाला देतो प्रकाश? असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीका केली. गावातील नागरिक आपली समस्या घेऊन कार्यालयात येतात मात्र अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत असल्याने नागरिकांचे काम रखडत असून त्यांना वारंवार हेलपाटे मरावे लागत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार कार्यालयात उशिरा येणे आणि ताटकाळात ठेवणे ती बाबा आता नित्यची झाली आहे. काही वेळा नागरिक तासन्तास वाट पाहुनी संबंधित अधिकारी भेटत नसल्याने तक्रार वाढत आहे. त्यातच रिकामे कार्यालयात दिवे आणि पंखे सुरू ठेव विजेचा अपव्यय होत असल्याने प्रशासनाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घ्यावी. कार्यालयात अनुपस्थिती ची चौकशी करावी. तसेच विजेचा अपव्याय करणाऱ्या संबंधितावर कारवाई अशी मागणी केलेली आहे. शासनाच्या पैशातून चालणारे कार्यालयातच शिस्त आणि जबाबदारीचा अभाव दिसत असेल सामान्य नागरिकांनी आदर्श कोणाकडून घ्यायचं असा सवाल चांदूर रेल्वे परिसरातून उपस्थित होत आहे.









