जनतेच्या हक्कासाठी लढणारा विकासाचा चेहरा
धामणगाव रेल्वे नगरपरिषद निवडणूक २०२५ पूर्वी वातावरण रंगात आले असून प्रभाग क्रमांक ६ मधून विनोद रामाजी तिरले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जनतेच्या मूलभूत सुविधा, विकासकामे व नागरिकांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारा चेहरा म्हणून त्यांची ओळख असून स्थानिक पातळीवर त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
नागरिकांच्या अपेक्षा, प्रलंबित विकासकामे व प्रभागातील प्रश्न सोडविण्यासाठी ठोस भूमिका घेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. “जनतेच्या विश्वासाला पात्र ठरून विकासाचा मार्ग मोकळा करणे हीच माझी प्राथमिकता असेल,” असे तिरले यांनी सांगितले.
प्रभागातील तरुण, महिला व ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून निवडणूक प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे.










