शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज कडू मध्यस्थीने उपोषणाची सांगता

0
36

विरूळ रोंघे येथील नागरिकांना मिळाला न्याय

धामणगाव रेल्वे:- तालुक्यातील विरूळ रोंघे येथे गावातील नागरिक अँड.किशोर रोंघे पुष्पा विनोद भेंडे या ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात स्थानिक समस्यांचे निराकरणासाठी ग्रामपंचायत भवन समोर गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषणाला बसले होते.त्यांच्या उपोषणाची दखल प्रशासनांना न घेतल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख मनोज कडू तालुकाप्रमुख नरेंद्र देऊळकर तालुका संघटक निलेश मुंदाने यांनी उपोषण स्थळी भेट दिलीउपोषणकर्त्यांचे प्रश्न समजून घेऊन अत्यंत किरकोळ असलेले प्रश्न उपोषणकर्त्याच्या घराला लागून शेजाऱ्यांच्या सांडपाण्यांची बंदोबस्त करण्याकरता ऍड. किशोर रोंघे उपोषणाला बसले तसेच पुष्पा विनोद भेंडे यांच्या घरासमोर शेजारच्या नागरिकांनी बांधलेला सिमेंटचा रट्टा व बारा फूट रस्ता मोकळ्या करणे या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. या प्रश्नाची प्रत्यक्ष पाहणी शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज कडू व इतर मंडळींनी केली त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी श्री भटकर साहेब तहसीलदार धामणगाव रेल्वे,तसेच गटविकास अधिकारी योगेश वानखडे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांना उपोषण स्थळी येण्याबाबत सुचविले. अन्यायग्रस्त उपोषण करते यांना गटविकास अधिकारी योगेश वानखडे विस्तार अधिकारी निलेश वाघ ग्रामपंचायत सचिव,सरपंच, उपसरपंच यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर सदर काम तात्काळ ग्रामपंचायतने करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर . शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज कडू यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी लिंबू पाणी घेऊन आपले उपोषण सोडले . गेल्या तीन दिवसापासून उपोषण करते आपल्या न्याय प्रश्नासाठी कडाक्याच्या थंडीत उपोषण करत असल्याने उपोषणकर्त्यांसह पुष्पा विनोद भेंडे यांचे वय पाहता त्यांची खालावत असलेली प्रकृती या सर्व बाबी निदर्शनास घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे जिल्हाप्रमुख मनोज कडूयांनी घेतलेला पुढाकार व प्रशासनाशी संपर्क करून यशस्वी उपोषणाची सांगता केल्याने विरूळ रोंघे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात गावातील नागरिकांनी पाठिंबा दिला होता.

veer nayak

Google Ad