अमरावती येथील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीच्या महिला आर्टस् कॉमर्स कॉलेज चांदूर रेल्वे मध्ये २०२५-२६ या शैक्षणिक सत्रातील स्नेहसंमेलन “उमंग-२०२६” वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांच्या यशस्वी आयोजनाने अविस्मरणीय असे ठरले आहे. विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीच्या सर्वच सन्माननीय कार्यकारिणी सदस्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.
दि.०९ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान विद्यार्थिनींसाठी विविध मैदानी खेळ तसेच मनोरंजक क्रीडाप्रकार आयोजित करण्यात आले. या सर्व क्रीडाप्रकारांना विद्यार्थिनींचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये प्रामुख्याने खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन, लगोरी, रिंग, रस्सीखेच, पोतेशर्यत, मटकीफोड, कॅरी ऑन बॉल या खेळाचा समावेश होता. या सर्व क्रीडाप्रकारांमध्ये विद्यार्थिनींना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक देत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
दि. १३ फेब्रुवारी रोजी विदर्भ युथ वेलफेअर सोसायचे अध्यक्ष सन्माननीय डॉ. नितीन धांडे यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीचे कोषाध्यक्ष मा. प्रा.(डॉ.) हेमंत देशमुख यांनी “उमंग-२०२६” चे उद्घाटन केले. या प्रसंगी कार्यकारिणी सदस्य मा. श्री. पंकज देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार देशमुख, उमंग चे समन्वयक प्रा. संजीव भुयार, डॉ. सीमा जगताप व्यासपीठावर उपस्थित होते. या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार देशमुख यांनी केले. तर उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. हेमंत देशमुख यांनी विद्यार्थिनींना मार्मिक प्रबोधन केले. अध्यक्षीय भाषणातून डॉ. नितीन धांडे यांनी या कार्यकाचे कौतुक व महत्व पटवून देत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत संपूर्ण उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शीतल रोकडे तर आभारप्रदर्शन प्रा. संजीव भुयार यांनी केले.
उद्घाटनानंतर लगेच विद्यार्थिनींच्या स्नेहभोजनाची व्यवस्था महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आली. दुपारच्या सत्रात गीतगायन व अंताक्षरी स्पर्धा घेण्यात आल्या. या उपक्रमाला विद्यार्थिनींचा भरपूर प्रतिसाद मिळाला. यामध्ये सुद्धा त्यांनी अनेक पारितोषिके पटकावली.
दि. १४ फेब्रुवारी रोजी आनंदमेळावा, पुष्परचना, पाक कला, वेशभूषा व नृत्य असे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक पारितोषिके पटकावली. दुपारच्या सत्रात समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे सचिव सन्माननीय श्री. युवराजसिंग चौधरी तर प्रमुख अतिथी चांदुर रेल्वेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा मा. सौ. प्रियंकाताई निलेश विश्वकर्मा तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार देशमुख, समन्वयक प्रा. संजीव भुयार, डॉ. सीमा जगताप, डॉ. विजय कापसे उपस्थित होते. याप्रसंगी नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. प्रियंकाताई विश्वकर्मा यांचा संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थींना प्रोत्साहन देत मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात ‘आजचा सक्षम विद्यार्थी उद्याचे भविष्य’ असे प्रेरणादायी मार्गदर्शन मा. श्री. युवराजसिंग चौधरी यांनी केले. यावेळी गुणवत्ता व प्राविण्य प्राप्त विद्यार्थिनींना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांनी गौरव केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शीतल रोकडे तर आभारप्रदर्शन डॉ. अतुल वानखडे यांनी केले.
विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटी, अमरावतीचे मा. अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, उपाध्यक्ष ॲड. श्री. उदय देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंत देशमुख, सचिव श्री. युवराजसिंग चौधरी, सदस्य श्री. नितीन हिवसे, सदस्या डॉ. सौ. पूनमताई चौधरी, सदस्य श्री. पंकज देशमुख, सदस्य प्रा. विनय गोहाड व सदस्य प्रा. गजानन काळे यांनी सर्व विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्यात.
“उमंग-२०२६” च्या यशस्वी आयोजना करिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार देशमुख यांच्यासह डॉ. सीमा जगताप, डॉ. विजय कापसे, प्रा. संजीव भुयार, प्रा. अनिता धुर्वे, डॉ. अतुल वानखडे, डॉ. नितीन भालेराव, प्रा. नीलिमा थोरात, प्रा. दीपक सुखदेवे, प्रा. शीतल रोकडे, प्रा. निकेश काळे, प्रा. ज्योती दिघाडे, प्रा. योगिता अकोत, कु रजनी वघवे, श्री. अनिल शास्त्रकार, श्रीमती रेखा मेश्राम, कु. पूजा देशमुख तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.











