इ लायब्ररी ही काळाची गरज, विश्वकर्मा दांपत्याचे काम उत्कृष्ट नगराध्यक्ष यांच्या ई वाचनालयाची माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा कडून प्रशंसा रिमोटची बटण दाबून इ लायब्ररी चे केले अनावरण

0
9

चांदूर रेल्वे:- तालुक्यासह शहरातील विद्यार्थी,युवक युवतींना बदलत्या काळानुसार सर्वसाधारण वाचालयना सह इ वाचनालय लवकरच मिळणार असून नगरसेवक निलेश विश्वकर्मा यांच्या संकल्पनेतून आणि नगराध्यक्ष प्रा प्रियंका विश्वकर्मा यांच्या पुढाकाराने ता 3 रविवार रोजी माजी सर न्यायाधीश भूषण गवई यांच्या शुभस्ते या इ वाचनालयाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. अतिशय स्तुत्य उपक्रम म्हणून माजी न्यायमूर्ती भूषण गवई यांनी या उपक्रमाची स्तुती केली.

ता 3 रविवार रोजी शहरातील नव्या न्यायालय इमारतीच्या कोनशीला कार्यक्रमाच्या भूमिपूजन आणि नगर परिषदेला भेट देण्यासाठी माजी न्यायमूर्ती भूषण गवई चांदूर रेल्वे ला आले होते. यावेळी न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते नगर परिषदे मार्फत इ वाचनालयाचे थाटात उद्घाटन करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष प्रियंका विश्वकर्मा व निलेश विश्वकर्मा यांनी शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन गवई साहेबांचे स्वागत केले, यावेळी शहरातील अनेक मान्यवरांनी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे स्वागत व सत्कार केले. इ वाचनालयाच्या माध्यमातून तालुक्यातील विद्यार्थ्यांना महागडे पुस्तके इ माध्यमातून नगर परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांना पुरविणार असून, नेट ची मोफत सेवा ही नगर परिषदेमार्फत देण्याचा मानस निलेश विश्वकर्मा यांनी व्यक्त केले, याच माध्यमातून शहरातील वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे याप्रसंगी त्यांनी सांगितले सांगितले, ई लायब्ररी ही काळाची गरज असून विश्वकर्मा दांपत्याचे काम उत्कृष्ट असल्याची प्रशंसा माजी सर न्यायाधीश भूषण गवई यांनी केली. यावेळी उच्च न्यायालय मुंबई येथील न्यायमूर्ती अनिल किलोर,न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांचीही उपस्थिती होती यांच्यासह खासदार बळवंत वानखडे,माजी आमदार विरेंद्र जगताप, न प मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी आदी उपस्थित होते.

veer nayak

Google Ad