तेली समाजाला डावलुन स्वतःच्या पत्नीला काँग्रेसची आर्वीत अध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाव म्हणून रचला डाव

0
106
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

काँग्रेस जिल्हाध्यक्षाची ऐन वेळेवर एबी फॉर्मची पळवा पळवी

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : येथे नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली होती.

 दिनांक. 17/11/2025 रोज सोमवार ला दाखल केलेल्या नगराध्यक्ष पदाचा नामनिर्देशन पत्राची संख्या (08) आज पावेतो नगराध्यक्ष पदाचे दाखल झालेले नामनिर्देशन पत्राची संख्या एकूण 12

———————————–

तसेच आज दाखल केलेल्या सदस्य पदाच्या नामनिर्देशन पत्राची संख्या 86 पावेताे दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्राची संख्या एकूण 118 भाजपच्या वतीने स्वाती प्रकाश गुल्हाने, काँग्रेस राष्ट्रवादी अंजली बाळा उर्फ स्वप्निल जगताप,

बहुजन समाज पार्टी भावना रवींद्र दारुंडे, राष्ट्रवादी अजित पवार गट शुभांगी श्रीकांत कलोडे,

शिवसेना शिंदे गट दिपाली निलेश देशमुख यांनी अधिकृत रित्या नामांकन दाखल केले.

काँग्रेसच्या स्थानिक पक्ष श्रेष्ठींना विश्वासात न घेता शरदचंद्र पवार राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसचे गटबंधन

काँग्रेस पक्षाचे एबी फॉर्म वेळेवर न आल्यामुळे काँग्रेसने अनंत मोहाेळ व शैलेश अग्रवाल यांच्या नेतृत्वात तयार केलेले 25 सदस्य व 1 नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची चांगलीच उडाली तारांबळ 3 वाजेपर्यंत पक्षाचा एबी फॉर्म मिळालाच नाही इच्छुक सदस्य नामांकित अर्ज दाखल करण्यास संविधानाने दिलेल्या अधिकारापासून राहले वंचित काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर मंजुषा अग्रवाल प्रणोती जयसिंगपूरे अनुराधा भुयार यांचे नाव पक्षश्रेष्ठीकडे नागपूरपर्यंत गेले होते 

सर्व इच्छुक नगरसेवक नगराध्यक्ष यांनी नागपूर येथे जाऊन प्रभारी राजेंद्र मुळक यांची भेटही घेतली होती. एबी फार्म साठी काँग्रेसचे 1 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच 25 नगरसेवक पदाचे उमेदवार आपले नामांकन अर्ज घेऊन नगरपरिषद कार्यालय येथे वाट पाहत बसले

मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत एबी फॉर्म उमेदवारांना मिळाला नसल्याने एकाही उमेदवाराचा नामांकन अर्ज दाखल झाला नाही हे विशेष… काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आर्वी येथील स्थानिक नेत्यांचा नवीन काँग्रेसला जुळलेल्या इच्छुक उमेदवारांचा चांगलाच गेम केला यामध्ये पंचवीसही नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींना जबाबदार ठरवत तीव्र नाराजी व्यक्त केली व मोठी मेहनत घेऊन काँग्रेसचे 25 उमेदवार शैलेश अग्रवाल अनंत मोहोळ यांनी आर्वी शहरात नवीन काँग्रेसची फळी निर्माण करून उभे केले होते मात्र काही जिल्हा कमिटी काँग्रेसच्या नेत्यांनी वेळेवर गेम करून काँग्रेसचाच घात केला त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या गटबंधनावर प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्वी शहरात रोशाचे वातावरण निर्माण झाले आहे याचा मोठ्या प्रमाणात या निवडणुकीमध्ये अशा गटबंधनावर तीव्र नाराजी व्यक्त करत महायुतीच्या या गटबंधनाला पराभव स्वीकारावा लागेल का? अशी देखील आर्वी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

veer nayak

Google Ad