सात दिवसीय विज्ञान संस्कार शिबिर यशस्वीरित्या संपन्न

0
8
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित, श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालय व विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ ,नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सात दिवसांच्या विज्ञान संस्कार शिबिर 2026 चा समारोपीय कार्यक्रम गुरूवारी दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी डॉ. शोभादेवी राठी अध्यक्षा ,शाळा समिती श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालय यांच्या अध्यक्षतेखाली , ॲड.आशिष राठी, सचिव, धामणगाव एज्युकेशन सोसायटी धामणगाव रेल्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सौ. माधुरी देहेडकर, प्रांत समन्वयक, विदर्भ विज्ञान मंथन नागपूर व सौ.सीमा कहू व आशिष जैन, सदस्य, विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ नागपूर यांच्या विशेष उपस्थितीत विद्यालयात संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. शिबिराच्या पहिल्या सत्रात शिबिरार्थींनी कृतीयुक्त प्रात्यक्षिक अनुभव; स्वयंसेवक व विद्यालयातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवसांत घेतले . शिबिराच्या दुसऱ्या सत्रात तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यात दिनांक 25 एप्रिल 2026 ला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पर्यावरणतज्ञ व पक्षीमित्र डॉ. किशोर रिठे यांनी पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टिकोनातून पशु व पक्षी यांच्याबाबतीत अतिशय उपयुक्त अशी माहिती शिबिरार्थींना दिली. दि.२६ ला कु. शितल जोशी यांनी वनस्पतीच्या उत्पत्ती पासून उत्क्रांतीपर्यंत असे विविध टप्पे नमुन्यांसह स्पष्ट केले. दिनांक 27 एप्रिल 2026 ला शिबिरार्थींनी आदर्श महाविद्यालय धामणगाव रेल्वे येथील वनस्पती उद्यानला प्राचार्य डॉ.सुधीर बायस्कर यांच्या उपस्थितीत क्षेत्रभेट दिली. यावेळी महाविद्यालयातील सहाय्यक प्रा. डॉ. श्रीकांत पाटील यांनी वनस्पती, त्यांचे प्रकार व त्यांची उपयुक्तता, याबद्दलचे उपयुक्त मार्गदर्शन केले. दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी डॉ. श्यामबाबू रौनियार, सावंगी, वर्धा यांनी शरीररचना शास्त्र यातील अंतर्गत व बाह्य अवयव त्यांची रचना , कार्य, विषयी विस्तृत मार्गदर्शन केले. दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी दर्यापूर येथील जे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अतुलजी बोडखे यांनी कोळी हा पर्यावरण संतुलनासाठी कसा उपयुक्त आहे या विषयाची अतिशय सुंदर माहिती दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून शिबिरार्थींना दिली. नगरपरिषद धामणगाव येथील विज्ञान केंद्रभेटीत वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट होतील असे प्रयोग,साहित्य विद्यार्थ्यांनी पाहीले, समजून घेतले. शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात उपस्थित शिबिरार्थींनी व शिक्षकांनी आपल्या मनोगतातून श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालयाने आयोजित केलेल्या शिबिरातून अनेक चांगल्या बाबी शिकायला मिळाल्या असे नमूद केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ॲड. आशिष राठी, अध्यक्षा डॉ.सौ शोभादेवी राठी यांनी उपक्रम राबविल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका , विज्ञान शिक्षक – शिक्षिका व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच नागपूर येथून विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळाच्या स्टेट कोऑर्डिनेटर सौ. माधुरी देहेडकर. उपस्थित विज्ञान भारती सदस्य यांनी शाळेने या उपक्रमाचे उत्तम आयोजन व नियोजनाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीता देशपांडे यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेच्या मुख्याध्यापिका यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तसेच उपमुख्याध्यापक,श्री‌. राठोड,पर्यवेक्षिका कु. टेंभुर्णे सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन सौ.नम्रता वैभव पोतदार तर आभार प्रदर्शन उमेश अरबट यांनी केले.

veer nayak

Google Ad