जिल्हा परिषद अमरावती व शिक्षण विभाग पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आमदार प्रतापदादा अडसड यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

0
1
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार प्रतापदादा अडसड यांनी सांगितले की, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असून त्यातून शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण घडतात. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा व कलागुण जोपासावेत, असे आवाहन केले.

 

महोत्सवात तालुक्यातील विविध प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद व पालकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. या यशस्वी आयोजनासाठी शिक्षण विभाग, पंचायत समिती, शिक्षकवृंद, मुख्याध्यापक, क्रीडाशिक्षक व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

veer nayak

Google Ad