स्वच्छता महोत्सव व माझी वसुंधरा अभियान 6.0 विशेष कार्यक्रमांतर्गत ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांचे प्रबोधन

0
21

धामणगाव रेल्वे…. नगरपरिषद धामणगाव रेल्वे महिला व बालकल्याण समिती धामणगाव रेल्वे अंतर्गत माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ शहर स्पर्धा 6.0 अंतर्गत भव्य महिला मेळावा व रथसप्तमी या सणाची औचित्य साधून महिलांकरिता हळदीकुंकू समारंभ व विशेष कार्यक्रम माऊली दास ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांचे समाज प्रबोधन कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आलेले होते. तसेच नगरसेविका सह रीना मनोज व्यास यांची महिला विषयी कायदे ,नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर अर्चना अरुण भाऊ अडसड यांचे मार्गदर्शन आयोजन करण्यात आलेले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अध्यक्ष डॉक्टर अर्चना अरुण भाऊ अडसड रोठे नवनिर्वाचित नगराध्यक्ष तथा प्रथम नागरिक उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे मुख्याधिकारी श्रीमती पूनम कळंबे धामणगाव नगरपरिषद या उपस्थित होते .मंचावर सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते .

हजारो महिलांच्या उपस्थितीत समाजप्रबोधनकार माऊली दास ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी आपल्या समाजप्रबोधनातून महिला जनजागृती विशेष भर दिला ते म्हणाले आजची महिला ही सक्षम झाली पाहिजे म्हणजेच देश सक्षम होईल .त्याचप्रमाणे महिलेने आपले कुटुंब आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावे जेणेकरून आदर्श विद्यार्थी निर्माण होईल व काळात वृद्धाश्रम याची आवश्यकता पडणार नाही .आई ही घराची मुख्य जननी असल्याने तिच्या हातात पाळण्याची दोरी असते आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीते नुसार महिला उन्नती अध्याया वर समाज प्रबोधनातून विशेष भर देण्यात आला. त्याचप्रमाणे गावांमध्ये होणारी अस्वच्छता व कचऱ्याचे व्यवस्थित व्यवस्थापन करावे संदेश गाडगे महाराज च्या वेशभूषेतून हनुमंत ठाकरे यांनी दिला जर प्रत्येकाने आपलं घर वांगण स्वच्छ केलं तर हळूहळू संपूर्ण नगर स्वच्छ होईल म्हणून आपण सर्वांनी स्वच्छतेवर भर द्यावा व सहकार्य करावे यावेळी कीर्तनाच्या माध्यमातून महिलांना सांगण्यात आले. त्याचप्रमाणे प्लास्टिकचा वापर वापर कमी करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी यावरही विशेष भर देण्यात आला. पर्यावरण समतोल राखणे काळाची गरज आहे .त्यासाठी पंचतत्व म्हणजे पृथ्वी अग्नी वायु जल आकाश यांची जपवणूक करणे ही काळाची गरज आहे . पृथ्वीवरचे झाड कापू नये ,सोलर सिस्टिम लावावी ,हवा प्रदूषित होणार नाही याकडे लक्ष द्यावे, पाणी हे शुद्ध असावी यामध्ये कोणतेही प्रकारचा केरकचरा टाकू नये. वायु प्रदूषण होणार नाही त्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करावा .तरुण युवा संघटना निर्माण करून सक्षम असे बचत गटाच्या माध्यमातून स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे घनकचरा ओला कचरा याची व्यवस्थित विल्हेवाट लावावे .या विषयावर ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी विशेष प्रबोधन केले. सोबतच समाजामध्ये वाढणारी व्यसने तिला कसा बंद बसतात करता येईल यासाठी महिलांना लक्ष देणे गरजेचे.संत गाडगे महाराज यांच्या वेशभूषेतील ग्रामगीताचार्य श्री हनुमंत ठाकरे यांनी आपल्या कीर्तनातून आपला हक्क कुटुंब चांगलं होण्यासाठी आपल्या घरी कोणी दारू पिणार नाही आणि पिऊन आल्यावर काय उपाययोजना करावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले महिलाही अबला नसून सबला आहे आणि तिच्या हातामध्ये आता सर्व अधिकार आल्याने ती मागे हटवून चालणार नाही त्यासाठी तिने विकासाचा पवित्रा घ्यावा जेणेकरून गाव आदर्श होईल तालुका आदर्श होईल जिल्हा आदर्श होईल राज्य आदर्श होईल व नंतर देश आदर्श झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी केले कार्यक्रमाला विशेष सहकार्य सुरेशराव ठाकरे यांनी खंजरी च्या आवाजाने संपूर्ण आलेल्या महिलांचे लक्ष वेधून घेतले वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाज जागृती विविध भजनांचे सादरीकरण कीर्तनाच्या माध्यमातून करण्यात आले .त्याने समाज जागृती झाली कार्यक्रमाचे विशेष कौतुक धामणगाव नगरपरिषद नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांनी ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांचा हार घालून सत्कार केला व अभिनंदन केले आज काळाच्या गरजेनुसार अशा प्रकारचे प्रबोधन समाजाला अतिशय आवश्यक आहे त्यांने समाज जागृत होईल त्या म्हणाल्या ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी केलेली समाज प्रबोधन कीर्तन कौतुकास्पद आहे . आज अशाच विचाराची आवश्यकता आहे जेणेकरून समाज जागृती होईलआणि म्हणून अशा कार्यक्रमाचे आयोजन जर झाले तर समाज जागृती होईल. असे प्रतिपादक नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अरुण भाऊ अडसड यांनी केले .आलेल्या हजारो महिलांना यावेळी हळदीकुंकू देऊन वृक्ष संवर्धन करण्यासाठी वृक्षांचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे महिलांना विविध विचार मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी तन मन धन असे सदा सुखी हो भारत देश हमारा या राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

veer nayak

Google Ad