रविवारी श्री भगवान परशुराम जन्मोत्सव. नगराध्यक्ष अर्चना अडसड व नगरसेवक द्विवेदी आणि व्यास यांचा सत्कार. गौपूजन व भजन संध्या.

0
3
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे: अखिल भारतीय ब्राम्हण सभा शाखा धामणगाव रेल्वेच्या वतीने, अक्षय तृतीया व भगवान ‘श्री परशुराम जन्मोत्सव’ च्या पावन पर्वावर आज रविवार दि. १९ एप्रिल सकाळी ९ वाजता श्री भगवान परशुराम मुर्ती पूजनाचा कार्यक्रम श्री मारुती देवस्थान टिळक चौक येथे करण्यात आलेला आहे तसेच सायंकाळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष अर्चना अडसड रोठे व नगरसेवक गोपाल द्विवेदी आणि रीना मनोज व्यास यांचा सत्कार श्री महावीर भवन येथे आयोजित करण्यात आलेला आहे
भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त अखिल भारतीय ब्राह्मण सभेच्या वतीने श्री गौरक्षण संस्था, धामणगाव रेल्वे येथे श्री गौमाता पूजनाचा कार्यक्रम सकाळी १० वाजता व महिलांचा कार्यक्रम श्री महावीर भवन येथे दुपारी १२ वाजता तसेच सायंकाळी ७ वाजता भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती व आवाहन अखिल भारतीय ब्राम्हण सभा, श्री परशुराम सेवा समिती, सर्व शाखीय ब्राम्हण सभा, श्री परशुराम महिला सेवा समिती धामणगाव रेल्वे यांच्या वतीने करण्यात आलेली आहे.

veer nayak

Google Ad