( उत्तम ब्राह्मणवाडे )
नांदगाव खंडेश्वर दि. 06/04/2026
गट ग्रामपंचायत सिद्धनाथ पुर येथील गेल्या दोन वर्षापासून अंडरग्राउंड सांडपाण्याची पाईप लाईन चोकअप झाली आहे या सांडपाण्याची विल्हेवाट होत नसल्यामुळे आठ ते दहा कुटुंबांना रोगराईजने ग्रासले आहे. साचलेल्या घाण पाण्याचे विल्हेवाट लावण्याबाबत ग्रामपंचायत कडे व पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांना पत्राद्वारे वारंवार तक्रार केली असता फक्त उडवा उडवी चे उत्तर मिळाले या या सांडपाण्याची विल्हेवाट लावली नाही तर पावसाळ्यात येणारे पाणी सुद्धा साचून राहील व पूर्ण गावकऱ्यांना रोगराईचा त्रास होईल
सिद्धनाथ पुर येथील सर्व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद अमरावती येथे धाव घेतली असता तहसील कार्यालय नांदगाव खंडेश्वर येथे पत्राद्वारे त्वरित या सांडपाण्याची व पावसाळी पाण्याची विल्हेवाट लावण्या सांगितले तरीसुद्धा आतापर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही सिद्धनाथ पुर येथील ग्रामस्थ रोगराईच्या जाळ्यात अडकले आणि या रोगराईमुळे जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे कारण की साचलेल्या सांडपाण्यापासून घाण वास व मच्छरामुळे सतत नऊ कुटुंबांना आजार राहतात या कुटुंबामध्ये लहान मुले व वयोवृद्ध ग्रामस्थ राहतात यांना वारंवार आजाराचा सामना करावा लागतो यावर त्वरित कारवाई करून सांडपाणी व पावसाच्या पाण्याची विल्हेवाट ग्रामपंचायत सिद्धनाथ पुर येथील सचिव साहेबांकडून त्वरित लावण्यात यावी

ग्रामस्थांना घाणीच्या साम्राज्यातून बाहेर काढावे
दि 15/04/2026 पर्यंत सांडपाण्याची विल्हेवाट न लावल्यास सिद्धनाथ पुर येथील ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालय आवारात उपोषणाला बसेल असे पत्राद्वारे कळवले आहे















