श्रीकृष्ण अवधूत महाराज प्रसन्न…

0
5

अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) . मालखेड चांदूर रेल्वे येथे असलेल्या श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधुत बुवा संस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

ही पवित्र यात्रा बुधवार दि. १८ मार्च २०२६ ते शुक्रवार दि. २७ मार्च २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली असून, या काळात विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा, कीर्तन-भजन आणि इतर धार्मिक सोहळे पार पडणार आहेत.

 

या यात्रा महोत्सवानिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. बाहेरगावावरून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी अमरावती व चांदूर रेल्वे बस स्थानकावरून बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन विश्वस्त मंडळ तथा यात्रा उत्सव समिती, श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

आयोजक मंडळी :

अध्यक्ष – श्री पुंजाराम वै. नेमाडे

उपाध्यक्ष – श्री कृपासागर रा.राऊत

सचिव – श्री अशोक ह. सोनवाल

विश्वस्त मंडळ :

श्री विनायक तु. पाटील

श्री गोविंद रा. राठोड

श्री फुलसिंग रु. राठोड

श्री चरणदास ना. कांडलकर

श्री प्रविण ना. कुकडकर

श्री लक्ष्मण दि. राठोड

श्री वैभव दि. मानकर

श्री स्वप्निल ब. चौधरी

 

तरी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री विठोबा कृष्ण अवघूत महाराज यांचे दर्शन घेऊन यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

veer nayak

Google Ad