चांदुर रेल्वे : तालुका प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले यांची जयंती स्थानिक मिलिनगर लुंबिनी बुद्ध विहार मध्ये मोठ्या उत्साहात साजरी सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्हा मध्ये नायगाव येथे झाला.सावित्रीबाई फुले यांचे नवव्या वर्षी 1840 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह झाला.महात्मा ज्योतिबा फुले यांनी वंचित गोरगरिब लोकांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले करून त्यांना समाजात सन्मान मिळवून देण्याचा ध्यास घेतला होता. महिलांवर होणारे अत्याचार पाहता त्यांनी महिलाही शिक्षित झाल्या पाहिजे करिता महिलांसाठी शिक्षण दरवाजे खुले केले मात्र कोणी महिला पुढाकार न घेतल्यामुळे त्यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाचे धडे शिकवण्यात सुरुवात केली. शिक्षण घेऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा 1848 मध्ये पुण्यात भिडे वाड्यात सुरू केली शिक्षण समानता सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर कार्य करून त्यांनी भारतीय स्त्री शिक्षणाची जननी म्हणून आज मानले जातात त्यांच्यामुळे आज भारतातील प्रत्येक महिला सामाजिक, राजकीय, नोकरी सर्वच ठिकाणी महिलांचा उच्च स्थान गाठन्या पुढे आहे. त्यांचे पूर्ण श्रय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा सिंहाचा मोठा वाटा आहे त्याचाच उदांत म्हणून आज मिलिनगर मध्ये मोठ्या उत्साहाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित तुळशाबाई खवसे मंगला बाई वानखडे आशाबाई वानखडे आशाबाई गवळी बेबीबाई वानखडे मायाबाई बोरकर ममताबाई वानखडे मनकर्णाबाई ढेरे वनिता बाई श्रीरामे अनिता आठवले सुलोबाई आठवले ललिता बाई डोंगरे रुपाली वानखडे वंशीका वानखडे नगर सेवक सुमेद सरदार












