कावली येथे श्रीगुरुदेव सुसंस्कार शिबिर संपन्न

0
39

कार्तिक पौर्णिमा निमित्याने कावली गावामध्ये श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने काकडा आरती,श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार अनिवासी शिबिर, परमहंस आडकुजी महाराज पुण्यतिथी, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पुण्यस्मरण व सर्व संत स्मृती दिन हे विविध कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात साजरे करण्यात आले.

या कार्यक्रमा अंतर्गत गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान, सामुदायिक ध्यान, काकडा आरती, रामधुन, सामुदायिक प्रार्थना, श्रीगुरुदेव पालखी सोहळा इत्यादी उपक्रम घेण्यात आले. श्रीगुरुदेव पालखी सोहळ्यामध्ये गावातील महिला भजन मंडळी,पुरुष भजन मंडळी व गावकरी नागरिकांनी सहभाग दर्शवुन पालखी मार्ग हा रांगोळी,देवंतांचे फोटो, आकर्षक देखावे,तोरने बांधुन पालखीचे स्वागत करण्यात आले.

दिवाळीच्या सुट्टीमध्ये गावातील मुलांना सुसंस्काराचे धडे देण्यासाठी गेल्या आठ वर्षापासून श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचे आयोजन श्रीगुरुदेव भक्त निवास कावली येथे श्रीगुरुदेव सेवा मंडळ व मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत कावली यांच्या लोकसहभागातून करण्यात आले. या वर्षी संस्कार शिबिर दिनांक २८ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२५ या नऊ दिवसासाठी घेण्यात आले होते. या संस्कार शिबिराचा समारोपीय कार्यक्रम दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ कार्तिक पौर्णिमेला सायंकाळी सामुदायिक प्रार्थनेनंतर घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिलीप इंगळे प्रमुख उपस्थिती श्री काठोडे गुरुजी, सरपंच सौ चंदा जांभळे, उपसरपंच श्री संदीप इंगळे, श्री रमेशराव ठाकरे, दीपक इंगळे, रविभाऊ चौधरी, गजुभाऊ भेंडे, गजेंद्र इंगळे,विनोद मानकर, अतुल परतेकी इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती. प्रमुख मान्यवर मंडळींच्या हस्ते प्रतिमेचे पुजन, हारार्पण करून ‘गुरुदेव हमारा प्यारा’ हे संकल्प गीत घेऊन कार्यक्रमाची रीतसर सुरुवात करण्यात आली.

दीपासन, लेझीम, लाठी-काठी, मल्लखांब,दांडपट्टा, फायर लाठी, ग्रामगीतेच्या ओव्या, भजन, श्लोक,भाषण इत्यादींचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी गावातील मंडळी व प्रमुख पाहुणे यांच्या समोर करून दाखविले. या शिबिरामध्ये गावातील १०० मुला-मुलींनी सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थ्यांना सन्मान पत्र व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या बाल मनावर ज्या शिक्षकांनी संस्काराचे धडे गिरवले अश्या शिक्षकांचा शाल,श्रीफळ,सन्मान चिन्ह,सन्मान पत्र उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गणेश केळोदे,संजय रोडे,विलास गेडाम,निलेश मोहकार,कृष्णा शेंडे,जयेंद्र सातपुते,प्रदीप राणे,नरेंद्र भोंगाडे,अनिल इंगळे व श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, हनुमान देवस्थान, गावकरी मंडळी यांनी अथक परिश्रम घेतले.

veer nayak

Google Ad