प्रतिनिधी | विशेष वृत्त
मैसूरू (कर्नाटक) येथे होणाऱ्या Men and Women Para Throw Ball National Championship 2026 या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी प्रशांत झाडे यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. ही प्रतिष्ठेची स्पर्धा दि. 24, 25 व 26 जानेवारी 2026 रोजी मैसूरू येथे पार पडणार आहे.
प्रशांत झाडे यांनी आपल्या सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर, उत्कृष्ट कामगिरी व खेळातील शिस्तीमुळे ही निवड मिळवली असून, त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाची छाप पाडत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाल्याने क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार, क्रीडा मार्गदर्शक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला असून, स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून यश मिळवण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मैसूरू येथे होणाऱ्या या राष्ट्रीय पॅरा थ्रो बॉल स्पर्धेत प्रशांत झाडे यांच्याकडून उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











