धामणगाव रेल्वे येथे श्री संत गजानन महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन

0
7

धामणगाव रेल्वे : शहरातील शास्त्री चौक परिसरात असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिरात सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा महाप्रसाद कार्यक्रम समस्त माऊली भक्त परिवार, धामणगाव रेल्वे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून धार्मिक परंपरा जपत भक्तांसाठी सेवा आणि प्रसाद वितरणाचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाप्रसाद कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून सकाळपासूनच मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम व पूजन विधी पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

गजानन महाराजांच्या भक्तांसाठी हा कार्यक्रम अत्यंत श्रद्धेचा आणि भक्तीचा मानला जात असून महाप्रसादाच्या निमित्ताने शहरातील तसेच आसपासच्या गावातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे. मंदिर परिसरात स्वच्छता, शिस्त आणि सेवा व्यवस्थेसाठी स्वयंसेवकांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

या कार्यक्रमात सर्व भाविकांनी वेळेत उपस्थित राहून गजानन महाराजांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

veer nayak

Google Ad